TRENDING:

Nandish Sandhu : रश्मी देसाईचा एक्स पती, २ वर्षात मोडलेला संसार; आता पुन्हा प्रेमात, थेट साखरपुड्याचे फोटो केले शेअर

Last Updated:
Nandish Sandhu engagement : 'उतरन' मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता नंदीश संधूने अभिनेत्री रश्मी देसाईसोबत लग्न केले होते. पण त्यांची ती प्रेम कहाणी अवघ्या दोन वर्षांत संपली. आता नंदीश संधूने आयुष्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे.
advertisement
1/8
रश्मी देसाईचा एक्स पती, २ वर्षात मोडलेला संसार; नंदीश संधू पुन्हा प्रेमात
मुंबई: टीव्ही मालिकेत 'उतरन'मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता नंदीश संधू पुन्हा एकदा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. एकेकाळी अभिनेत्री रश्मी देसाईसोबत त्याचे लग्न झाले होते, पण त्यांची ती प्रेम कहाणी अवघ्या दोन वर्षांत संपली. आता नंदीश संधूने आयुष्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे.
advertisement
2/8
त्याने नुकताच साखरपुडा केला असून आपल्या सोशल मीडियावर साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत, ज्यात त्याच्या बोटातली रिंग स्पष्ट दिसत आहे.
advertisement
3/8
नंदीश संधू हा टीव्ही विश्वातील एक लोकप्रिय चेहरा आहे. २५ जानेवारी १९८१ रोजी राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात जन्मलेल्या नंदीशने २००६ मध्ये 'शू... फिर कोई है' या मालिकेतून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली.
advertisement
4/8
पण त्याला खरी ओळख मिळाली ती २००८ मधील सुपरहिट मालिका 'उतरन' मधून. या मालिकेत त्याची आणि अभिनेत्री रश्मी देसाईची जोडी चांगलीच गाजली. पडद्यावर फुललेली ही प्रेम कहाणी त्यांच्या खाजगी आयुष्यातही खरी ठरली. दोघांनी काही काळ त्यांचं अफेअर लपवून ठेवले, पण २०१२ मध्ये त्यांनी लग्न केले.
advertisement
5/8
लग्न झाल्यानंतर दोनच वर्षांत नंदीश आणि रश्मी यांच्यात खटके उडू लागले आणि २०१४ मध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येऊ लागल्या. अखेर, २०१६ मध्ये दोघांनी परस्पर सहमतीने घटस्फोट घेतला.
advertisement
6/8
घटस्फोटानंतर रश्मी देसाईने अनेकदा नंदीशवर सार्वजनिकरित्या गंभीर आरोप केले होते. नंदीशच्या जीवनशैलीवर आणि अनेक मुलींशी असलेल्या त्याच्या मैत्रीबद्दल रश्मीने काही मुलाखतींमध्ये उघडपणे सांगितले होते. या आरोपांमुळे नंदीशची खूप बदनामी झाली होती. रश्मीच्या मुलाखती पाहिल्यानंतर नंदीश तिच्याशी मैत्री ठेवणेही योग्य मानले नाही, असे त्याने एकदा सांगितले होते.
advertisement
7/8
आता नंदीशने या सर्व गोष्टी मागे सोडून आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने दुसऱ्यांदा साखरपुडा उरकला असून, त्याचे फोटो शेअर केले आहेत. नंदीश संधू लवकरच एका नवीन आयुष्याला सुरुवात करणार आहे.
advertisement
8/8
नंदीशने कविता बॅनर्जीसोबत साखरपुडा केला आहे. कविताही एक अभिनेत्री असून तिने काही वेबसीरिज आणि पौराणिक मालिकांमध्ये काम केलं आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Nandish Sandhu : रश्मी देसाईचा एक्स पती, २ वर्षात मोडलेला संसार; आता पुन्हा प्रेमात, थेट साखरपुड्याचे फोटो केले शेअर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल