TRENDING:

पन्नाशीतही इतक्या सुंदर कशा दिसतात वर्षा उसगावकर? सांगितलं 'ब्युटी सिक्रेट'

Last Updated:
varsha usgaonkar beauty secret : 'बिग बॉस मराठी'च्या घरात वर्षा ताईंनी त्यांच्या फिटनेसचं आणि सौंदर्याचं रहस्य सांगितलं आहे.
advertisement
1/7
पन्नाशीतही इतक्या सुंदर कशा दिसतात वर्षा उसगावकर? सांगितलं 'ब्युटी सिक्रेट'
बिग बॉस मराठीच्या घरात आपल्या चिरतरूण सौंदर्यानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कोणी असतील त्या अभिनेत्री वर्षा उसगावकर आहेत.
advertisement
2/7
मराठी इंडस्ट्रीतील एव्हरग्रीन ब्युटी म्हणून त्या ओळखल्या जातात. त्यांच्या अभिनयाइतकीच त्यांच्या सौंदर्याची आणि दिसण्याचंही प्रेक्षकांनी तितकंच कौतुक केलं.
advertisement
3/7
वर्षा उसगावकर यांचं ब्युटी सिक्रेट त्यांनी बिग बॉसच्या घरात स्वत:च सांगितलं. वर्षा ताई कॅप्टन झाल्यामुळे कॅरामल कस्टर्ड बनवून घरातील सदस्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं आहे.
advertisement
4/7
वर्षा ताई कॅरामल कस्टर्ड खात कॅमेऱ्यासमोर येऊन म्हणत आहेत,"आमच्याकडे भरपूर दूध, अंडी आणि साखर असल्यामुळे आम्ही घरी कॅरामल कस्टर्ड बनवलं. जान्हवीने वेळात वेळ काढून हे कॅरामल कस्टर्ड बनवलं आहे".
advertisement
5/7
"कॅरामल कस्टर्ड खाताना मला खूप छान वाटतंय. आज खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की कॅप्टनसीचं सेलिब्रेशन झालंय".
advertisement
6/7
कॅरामल कस्टर्ड खात खात वर्षा ताई पुढे म्हणतात,"आता तुम्हाला कळलचं असेल माझ्या सौंदर्याचं रहस्य. मी सडपातळ असण्याचं रहस्य हेच आहे की मी सगळं खाते".
advertisement
7/7
"प्राणायाम, योगासनं आणि घरचं जेवण करणं हेच माझ्या सौंदर्याचं रहस्य आहे", असं वर्षा ताईंनी सांगितलं.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पन्नाशीतही इतक्या सुंदर कशा दिसतात वर्षा उसगावकर? सांगितलं 'ब्युटी सिक्रेट'
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल