Actress Life: 32 वर्षीय अभिनेत्री, एकेकाळी अभिनय सोडण्याच्या तयारीत होती; आज OTT वर हिट
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना एकेकाळी ही इंडस्ट्री सोडायची होती. मात्र आज ते प्रसिद्ध स्टार बनले आहेत. अशीच एक अभिनेत्री जिनेही अभिनय सोडण्याचा विचार केला होता मात्र आज ती मल्टिलॅग्वेजमध्ये काम करत आहे.
advertisement
1/7

2/7
चंदीगडमध्ये जन्मलेली ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून वामिका गब्बी आहे. 29 सप्टेंबरला ती 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. याचनिमित्ताने तिच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊया.
advertisement
3/7
चंदीगडमध्ये जन्मलेली ही अभिनेत्री आज हिंदी, पंजाबी, तमिळ, तेलुगू अशा अनेक भाषांतील चित्रपट व मालिका करत आहे. लहान वयात अभिनय सुरू केलेली वामिका आज OTT जगतात सर्वाधिक चर्चेत असलेली स्टार मानली जाते.
advertisement
4/7
वयाच्या फक्त 8 व्या वर्षी टीव्ही मालिकेत काम करून तिने मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर "जब वी मेट" मध्ये करीना कपूरच्या बहिणीच्या भूमिकेत ती दिसली. 2013 च्या "तू मेरा 22 मैं तेरा 22" या पंजाबी चित्रपटामुळे तिला पहिली मोठी ओळख मिळाली.
advertisement
5/7
वामिकाने पंजाबी चित्रपटांसह दक्षिणेतील सिनेमांमध्येही आपली कला दाखवली. पण तिच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरले OTT प्रोजेक्ट्स. विशाल भारद्वाज दिग्दर्शित "खुफिया" आणि अमेझॉन प्राइमची "ज्युबिली" यांनी तिला नवी ओळख मिळवून दिली.
advertisement
6/7
अलीकडेच वामिका "मॉडर्न लव्ह मुंबई" मधील तिच्या जबरदस्त अभिनयासाठी चर्चेत आली. याशिवाय ती "दिल दिया गल्लन," "परहुना," "83," आणि "निक्का झैलदार" सारख्या हिट चित्रपटांचा भाग राहिली आहे.
advertisement
7/7
एकेकाळी अभिनय सोडण्याचा विचार करणारी वामिका आज हिंदी-पंजाबी चित्रपटांपासून ते OTT प्रोजेक्ट्सपर्यंत आपला ठसा उमटवत आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Actress Life: 32 वर्षीय अभिनेत्री, एकेकाळी अभिनय सोडण्याच्या तयारीत होती; आज OTT वर हिट