Ankita Lokhande Birthday: अंकिता लोखंडे-विकी जैनचं बिनसलं? अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीमध्ये दिसला नाही नवरा, काय भानगड
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ankita Lokhande Birthday: अंकिताच्या वाढदिवसाच्या फोटोंमध्ये विक्की कुठेही दिसला नाही, त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की विक्की नेमका कुठे आहे?
advertisement
1/8

मराठी मालिकाविश्वातली लाडकी सून आणि बॉलीवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी अंकिता लोखंडे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. निमित्त आहे तिच्या ४१ व्या वाढदिवसाचं!
advertisement
2/8
१९ डिसेंबर २०२५ रोजी अंकिताने तिचा ४१ वा वाढदिवस साजरा केला आणि हे सेलिब्रेशन एखाद्या सोहळ्यापेक्षा कमी नव्हतं. सोशल मीडियावर सध्या अंकिताच्या या बर्थडे पार्टीच्या फोटोंनी आणि व्हिडिओंनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
advertisement
3/8
वाढदिवसाच्या रात्री अंकिताने पुन्हा एकदा आपला ग्लॅमरस अंदाज दाखवला आहे. तिने ऑलिव्ह ग्रीन रंगाचा एक अत्यंत स्टायलिश आणि फिटिंगचा ड्रेस घातला होता. हाय पोनीटेल हेअरस्टाईल आणि मिनिमल दागिने तिच्या सौंदर्यात भर घालत होते. ४१ व्या वर्षीही अंकिता अतिशय फिट दिसत होती.
advertisement
4/8
अंकिताच्या या जंगी पार्टीला टीव्ही विश्वातील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यामध्ये प्रामुख्याने 'लाफ्टर शेफ्स' फेम समर्थ जुरेल, दिव्या अग्रवाल, अपर्णा दीक्षित आणि मानशा बहल यांचा समावेश होता.
advertisement
5/8
अंकिताने तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत केक कापतानाचा आणि डान्स करतानाचा आनंद सोशल मीडियावर शेअर केला आहे. फुगे, आकर्षक लाइट्स आणि गाण्यांच्या तालावर अंकिताने आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
advertisement
6/8
सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना एका गोष्टीने चाहत्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली, ती म्हणजे अंकिताचा पती विक्की जैन याची अनुपस्थिती. वाढदिवसाच्या फोटोंमध्ये विक्की कुठेही दिसला नाही, त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की विक्की नेमका कुठे आहे?
advertisement
7/8
मात्र, विक्कीने प्रत्यक्ष हजर नसला तरी सोशल मीडियावर पत्नीवर प्रेमाचा वर्षाव करून सर्व अफवांना पूर्णविराम दिला आहे. विक्कीने अंकितासाठी एक अत्यंत रोमँटिक पोस्ट शेअर केली. त्याने लिहिलं, "जगातील सर्वात जास्त प्रेम करणाऱ्या आणि काळजी घेणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. कदाचित तुझ्या प्रेमाची खोली मला समजली नसेल, पण तेच प्रेम आपल्याला एकत्र बांधून ठेवतं."
advertisement
8/8
'बिग बॉस १७' नंतर अंकिता आणि विक्कीचं नातं नेहमीच चर्चेत राहिलं आहे. विक्कीच्या या भावनिक पोस्टने चाहत्यांची मने जिंकली असून, अंकितानेही या पोस्टवर प्रेमाची दाद दिली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Ankita Lokhande Birthday: अंकिता लोखंडे-विकी जैनचं बिनसलं? अभिनेत्रीच्या बर्थडे पार्टीमध्ये दिसला नाही नवरा, काय भानगड