Do You know : TV चा आकार हा आयताकृतीच का असतो? तो गोल किंवा त्रिकोणी का नाही; 99 टक्के लोकांना माहित नाही यामागचं लॉजिक
- Published by:Devika Shinde
Last Updated:
तुम्ही कधी विचार केला आहे का की, टीव्हीचा आकार नेहमी 'आयताकृती' (Rectangular) का असतो? तो गोल, त्रिकोणी किंवा चौरस का बनवला गेला नसावा? हा प्रश्न जरी साधा वाटत असला तरी यामागे एक मोठं वैज्ञानिक आणि तांत्रिक कारण दडलं आहे. चला तर मग, यामागचं गुपित उलगडूया.
advertisement
1/8

90 च्या दशकात ज्यांच्या घरी टीव्ही असायचा, त्यांना अख्ख्या गावात मान असायचा. रविवारी 'रामायण' किंवा 'महाभारत' पाहण्यासाठी शेजारच्या लोकांची गर्दी व्हायची. लोक रंगोली किंवा चार्लीचापलीनचा शो पाहायला देखील गर्दी करायचे. कोणा एका व्यक्तीच्या घरी टीव्ही असायचा त्यामुळे लोक त्याच्या घरी गर्दी करायचे. काळ बदलला, तंत्रज्ञान स्वस्त झालं आणि आज प्रत्येक घराच्या भिंतीवर टीव्ही आला आहे. त्यामुळे टीव्ही आता प्रत्येक घरातील ओळख झाला आहे. शहरी भागात तर तुम्हाला क्वचितच असं कोणतं घर दिसेल जिथे टीव्ही नाही.
advertisement
2/8
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, टीव्हीचा आकार नेहमी 'आयताकृती' (Rectangular) का असतो? तो गोल, त्रिकोणी किंवा चौरस का बनवला गेला नसावा? हा प्रश्न जरी साधा वाटत असला तरी यामागे एक मोठं वैज्ञानिक आणि तांत्रिक कारण दडलं आहे. चला तर मग, यामागचं गुपित उलगडूया.
advertisement
3/8
'अस्पेक्ट रेशो'चं गणितआज आपण जे काही टीव्हीवर पाहतो, मग तो चित्रपट असो किंवा एखादी मालिका, ते सर्व 16:9 Ratio या गुणोत्तरात शूट केलेलं असतं. जर टीव्हीचा आकार गोल असता, तर या आयताकृती कंटेंटचा बराचसा भाग स्क्रीनच्या बाहेर गेला असता किंवा कोपऱ्यात मोठी काळी जागा सुटली असती. या 16:9 मुळेच आपल्याला 'सिनेमॅटिक व्ह्यू' मिळतो.
advertisement
4/8
50 च्या दशकातील तो 'गोल' भ्रम1950 ते 1980 च्या दरम्यान येणारे CRT टीव्ही आठवतायत? ते बाहेरून थोडे गोलाकार दिसायचे. पण वास्तव हे होतं की, त्यांच्या आतील स्क्रीन तेव्हाही 4:3 या आयताकृती गुणोत्तरातच असायची. गोलाकार काचेमुळे तो फक्त बाहेरून तसा दिसायचा. पुढे तंत्रज्ञान प्रगत झालं आणि एलसीडी (LCD), एलईडी (LED) आल्यावर ही गरज उरली नाही.
advertisement
5/8
त्रिकोणी किंवा गोल टीव्ही का फेल ठरले असते? कल्पना करा की तुम्ही गोल टीव्हीवर क्रिकेट पाहत आहात. अशा वेळी फलंदाज एका टोकाला आणि गोलंदाज दुसऱ्या टोकाला असेल, तर गोल स्क्रीनमुळे त्यांचे चेहरे किंवा स्कोअर बोर्ड कट झाला असता. कोणताही फोटो किंवा व्हिडिओ हा चौकोनी किंवा आयताकृती फ्रेममध्येच बसतो. जर स्क्रीनचा आकार बदलला, तर कंटेंट दाखवणं अशक्य होईल.
advertisement
6/8
मानवी डोळ्यांची रचनाविज्ञानानुसार, मानवी डोळ्यांची पाहण्याची क्षमता ही उभ्या आकारापेक्षा आडव्या आकारात जास्त असते. आपण जेव्हा आजूबाजूला पाहतो, तेव्हा आपल्याला 'पॅनोरॅमिक' व्ह्यू दिसतो. आयताकृती स्क्रीन आपल्या डोळ्यांच्या या नैसर्गिक क्षमतेशी तंतोतंत जुळते, ज्यामुळे डोळ्यांवर ताण येत नाही आणि चित्र स्पष्ट दिसतं.
advertisement
7/8
LCD आणि LED पॅनेल तयार करताना ते मोठ्या शीटमधून कापले जातात. आयताकृती आकारात हे पॅनेल कापल्यामुळे साहित्याचा अपव्यय (Wastage) होत नाही. जर गोल स्क्रीन कापायची ठरवली, तर कोपऱ्यातील बराचसा भाग वाया जाईल, ज्यामुळे टीव्हीच्या किमती आकाशाला भिडतील.
advertisement
8/8
थोडक्यात काय आयताकृती आकार हा केवळ डिझाइन नसून ते विज्ञान, तंत्रज्ञान आणि मानवी गरजांचा एक उत्तम संगम आहे. त्यामुळेच जगात कितीही क्रांती झाली तरी टीव्हीचा मूळ आकार बदलणं कठीण आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/टेक्नोलॉजी/
Do You know : TV चा आकार हा आयताकृतीच का असतो? तो गोल किंवा त्रिकोणी का नाही; 99 टक्के लोकांना माहित नाही यामागचं लॉजिक