TRENDING:

Dhurandhar: धुरंधरचा ‘बडे साहब’ कोण? समोर आले मोठे नाव; पार्ट 2 मध्ये दिसणार हम्झाच्या हिटलिस्टमधील पुढील टार्गेट

Last Updated:
Who Is Bade Sahab In Dhurandhar: ‘धुरंधर’च्या शेवटच्या दृश्यात हम्झा अली मझारीच्या हिटलिस्टमधील ‘बडे साहब’ हे नाव प्रेक्षकांसाठी मोठे गूढ ठरले आहे. या एका संकेतामुळेच आता ‘धुरंधर 2’मध्ये दाऊद इब्राहिमची एंट्री होणार का, याबाबत चर्चा रंगू लागली आहे.
advertisement
1/11
धुरंधरमधील ‘बडे साहब’ कोण? समोर आले मोठे नाव; पार्ट 2 मध्ये दिसणार पुढील टार्गेट
‘धुरंधर’ चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात रणवीर सिंग साकारलेला हम्झा अली मझारी आपल्या हिटलिस्टमधून रहमान डकैत (अक्षय खन्ना) याचं नाव खोडून टाकतो. त्या गुप्त डायरीच्या पानावर अनेक नावे दिसतात, जी त्याची पुढील टार्गेट असू शकतात. मात्र त्यातील एक नाव प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो, ते म्हणजे ‘बडे साहब’.
advertisement
2/11
सुरुवातीला हा क्षण सहज नजरेत न भरणारा वाटू शकतो. पण बारकाईने पाहणाऱ्या चाहत्यांना यात एक मोठा संकेत (ईस्टर एग) सापडला असून तो थेट ‘धुरंधर 2’कडे इशारा करतोय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
advertisement
3/11
‘धुरंधर’चा शेवट केवळ क्लिफहँगरवर होत नाही, तर एक मोठा खुलासा देखील करतो. रणवीर सिंगचे खरे नाव जसकीरत सिंग रंगी असल्याचे समोर येतं आणि तो एक प्रशिक्षित भारतीय सैनिक आहे. ज्याला एका गुप्त मोहिमेसाठी पाकिस्तानात पाठवण्यात आले आहे.
advertisement
4/11
या मोहिमेचा मुख्य उद्देश अजून स्पष्ट झालेला नसला, तरी चित्रपटात तो आपले एक मोठे लक्ष्य असलेल्या रहमान डकैतला संपवतो. शेवटच्या दृश्यात तो डायरीत उरलेली नावे पाहतो. त्यात मेजर इक्बाल (अर्जुन रामपाल) आणि त्याची टीमही आहे. जी आता दुसऱ्या भागात हम्झाची पुढची शिकार असणार आहे.
advertisement
5/11
हिटलिस्टमध्ये शेवटी ठळक अक्षरात लिहिलेले नाव आहे बडे साहब. चित्रपटात मेजर इक्बाल अनेकदा या व्यक्तीचा उल्लेख करतो. त्याच्या मते, बडे साहब हा संपूर्ण नेटवर्क नियंत्रित करणारा अत्यंत प्रभावशाली माणूस आहे. तो ISI, अंडरवर्ल्ड आणि दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड असल्याचा इशारा केला जातोय.
advertisement
6/11
दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमुळे या रहस्याला नवे वळण मिळाले आहे. एका युजरने ‘धुरंधर’च्या अ‍ॅक्टिंग क्रेडिट्सचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात दाऊद इब्राहिम हे नाव दिसतं.
advertisement
7/11
पहिल्या भागात दाऊद इब्राहिम प्रत्यक्ष दिसलेला नाही. पण ‘धुरंधर 2’मध्ये त्याची मोठी भूमिका असू शकते, असा अंदाज चाहत्यांकडून लावला जात आहे. भारताचा मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार आणि डी-गँगचा प्रमुख असलेल्या दाऊदची भूमिका दानीश इक्बाल साकारणार असल्याची चर्चा आहे.
advertisement
8/11
या शक्यतेनंतर सोशल मीडियावर तर्कवितर्क सुरू झाले आहेत. एका युजरने लिहिले, जर बडे साहब म्हणजे दाऊद इब्राहिम असेल, तर स्टोरी खूपच रोचक होईल. कारण दाऊदचा भाऊ उझैर बलोचकडून मारला गेला होता.
advertisement
9/11
दुसऱ्या युजरचे मत वेगळे होते, “ISI मधील मेजर इक्बाल एखाद्या भारतीय डॉनला ‘बडे साहब’ म्हणेल असे वाटत नाही. तो नक्कीच पाकिस्तान लष्कर किंवा ISI मधील मोठा अधिकारी असावा.”
advertisement
10/11
काहींनी तर हाफिज सईद किंवा पाकिस्तानी आर्मी चीफ यांचं नावही पुढे केले आहे. अनेकांचे मत आहे की हे सगळे प्रश्न ‘धुरंधर 2’मध्येच स्पष्ट होतील.
advertisement
11/11
सध्या हम्झाच्या डायरीतला तो एकमेव महत्त्वाचा धागा म्हणजे बडे साहब. तो नक्कीच या भारतीय गुप्तहेराचे एक मोठे लक्ष्य आहे. 90च्या दशकात गुन्हेगारी, राजकारण आणि दहशतवाद यांच्याशी दाऊद इब्राहिमचे जाळे खोलवर पसरलेले होते. त्यामुळे तो चित्रपटात आला, तर ‘धुरंधर 2’मध्ये त्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार, यात शंका नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Dhurandhar: धुरंधरचा ‘बडे साहब’ कोण? समोर आले मोठे नाव; पार्ट 2 मध्ये दिसणार हम्झाच्या हिटलिस्टमधील पुढील टार्गेट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल