TRENDING:

Sonakshi Zaheer Marriage: कोण आहे शत्रुघ्न सिन्हाचा होणारा जावई? जहीर इकबालची एकूण संपत्ती किती?

Last Updated:
दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा जहीर इकबालची एकूण किती संपत्ती आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
1/8
कोण आहे शत्रुघ्न सिन्हाचा होणारा जावई? जहीर इकबालची एकूण संपत्ती किती?
दिग्गज अभिनेता शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी सोनाक्षी सिन्हा लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहेत. सोनाक्षी सिन्हाचा होणारा नवरा जहीर इकबालची एकूण किती संपत्ती आहे? याविषयी जाणून घेऊया.
advertisement
2/8
सोनाक्षीचा होणारा नवरा आणि शत्रुघ्न सिन्हांचा होणारा जावई जहीर इकबाल किती कमावतो आणि त्याच्याकडे किती नेटवर्थ आहे याविषयी अधिक माहिती घेऊ.
advertisement
3/8
जहीर इकबालचं खरं नाव जहीर रत्नसी आहे. जहीरने मुंबईच्या स्कॉटिश स्कूलमधून शिक्षण घेतलं आहे. शत्रुघ्न सिन्हा यांचा भावी जावई हा अभिनेता असून त्याने 2019 मध्ये पदार्पण केलं होतं. इंडस्ट्रीत जवळपास 5 वर्षे घालवलेल्या जहीरने केवळ 2 चित्रपटांमध्ये काम केलंय.
advertisement
4/8
अभिनेता होण्यापूर्वी जहीरने पडद्यामागेही काम केलेलं आहे. 2014 मध्ये जहीरने 'जय हो' चित्रपटात सोहेल खानसोबत सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही काम केलं होतं. त्याची इंडस्ट्रीतील कारकीर्द एवढी खास राहिलेली नाही.
advertisement
5/8
जहीरचे सलमान खानसोबत खूप जवळचे नाते आहे. तो बिल्डर इक्बाल रत्नासी यांचा मुलगा आहे, जो सलमान खानचा जवळचा मित्र आहे. इक्बाल रत्नासी हे मुंबईतील प्रसिद्ध ज्वेलर्स आणि व्यावसायिकांपैकी एक आहेत.
advertisement
6/8
सोनाक्षी आणि जहीर यांच्या वयात दोन वर्षांचा फरक आहे. सोनाक्षी 37 वर्षांची आहे आणि झहीर 35 वर्षांचा आहे. दोन्ही जोडप्यांच्या नेट वर्थमध्ये खूप फरक आहे.
advertisement
7/8
फिल्मी बीटच्या रिपोर्टनुसार, 2010 मध्ये डेब्यू करणारी सोनाक्षी आज जवळपास 85 कोटी रुपयांची मालक आहे. तर जहीर इक्बालची स्वतःची संपत्ती सोनाक्षीच्या तुलनेत कमी आहे. मॉडेलिंग, जाहिराती किंवा चित्रपट करून 1 ते 2 कोटी रुपये तो कमावतो. याशिवाय तो एक बिझनेसमॅनही आहे.
advertisement
8/8
सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांच्या लग्नाचे आमंत्रण ऑनलाइन लीक झालं होतं, त्यानंतर काही तासांनी शत्रुघ्न सिन्हा आपल्या मुलीच्या लग्नाबद्दल बोलले. शत्रुघ्न सिन्हा म्हणाले होते की, मी त्यांच्या लग्नाच्या बातम्यांना दुजोरा देत नाही आणि नाकारत नाही. सोनाक्षी आणि जहीरच्या लग्नाबाबत अशी चर्चा आहे की दोघे 23 जूनला लग्नबंधनात अडकणार आहेत.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
Sonakshi Zaheer Marriage: कोण आहे शत्रुघ्न सिन्हाचा होणारा जावई? जहीर इकबालची एकूण संपत्ती किती?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल