TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीच्या वातावरणात पुन्हा बदल, हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
Weather Alert: मुंबई-ठाण्यासह कल्याण-डोंबिवली परिसरात हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 3 डिसेंबरचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीच्या वातावरणात पुन्हा बदल, हवामान विभागाचा अलर्ट
वातावरण बदलामुळे राज्यभरात थंडीचा कडाका वाढला आहे. ठाणे जिल्ह्यात देखील बुधवारी तापमानाचा पारा 20 अशांच्या खाली घसरला होता. आज पुन्हा हवामान अंशतः ढगाळ आणि धुके राहण्याची शक्यता आहे. उत्तरेतून येणाऱ्या शीत लहरींमुळे ठाण्यातील कल्याण-डोंबिवली परिसरात हुडहुडी जाणवत आहे. 4 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.
advertisement
2/5
कल्याण तालुक्यातील हवामान सध्या थंडीचे असले तरी हुडहुडी भरेल इतके तीव्र नाही, किमान तापमान साधारणपणे 21 अंश सेल्सिअसच्या आसपास आहे आणि कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता आहे. ढगाळ वातावरण आणि धुके जाणवत आहे, ज्यामुळे गारवा जाणवत असला तरी थंडीची लाट येण्याची शक्यता कमी आहे, असे हवामान विभागाच्या अंदाजानुसार समजते. कल्याणमध्ये आज हवामान अंशतः ढगाळ आहे आणि तापमान दमट असणार आहे.
advertisement
3/5
आज डोंबिवलीमध्ये हवेतील गारवा वाढला असून थंडीचे वातावरण जाणवत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे तापमानात घट झाली आहे, ज्यामुळे हवामानात गारवा आहे. बुधवारी 19 अंशांपर्यंत पारा घसरला होता. आज मात्र 2 अशांची वाढ होणार अशून किमान तापमान 21 अंशांवर राहण्याचा अंदाज आहे.
advertisement
4/5
ग्रामीण आणि डोंगराळ भागांमध्ये थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे. या भागांमध्ये पहाटेच्या वेळी दाट धुके (Dense Fog) राहणार असून किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिले. त्यामुळे ग्रामीण भागातील लोक शेकोट्याचा आधार घेत आहेत.
advertisement
5/5
थंडीचा वाढता प्रभाव पाहता आज कल्याण ग्रामीण भागातील तापमान साधारणपणे 21°C ते 30°C च्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये हवामानातील थंड हवेमुळे दिवसाची सुरुवात थंडीने होऊ शकते. वाऱ्याचा वेग 10 ते 15 किमी प्रति तास राहण्याची शक्यता आहे. दिवसभर वातावरण दमट आणि कोरडे राहील. पुढील काही दिवस हवामानाची हीच स्थिती कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीच्या वातावरणात पुन्हा बदल, हवामान विभागाचा अलर्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल