TRENDING:

Weather Alert: कल्याण-डोंबिवलीची हवा बिघडली, शुक्रवारी अलर्ट, आज कसं असेल हवामान?

Last Updated:
Weather Alert: ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीच्या हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. आज शुक्रवारचं हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
1/5
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीची हवा बिघडली, शुक्रवारी अलर्ट, आज कसं असेल हवामान
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा गारठा वाढला आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये किमान तापमानात घट झाली आहे. मुंबई-ठाणे जिल्ह्यात आज पावसाची शक्यता नसली तरी, ढगाळ वातावरणामुळे धुके आणि थंडीचा जोर काही दिवस कायम राहणार आहे. 9 जानेवारी रोजी कल्याण डोंबिवली शहरातील हवामानाची काय स्थिती असेल? जाणून घेऊ. मुंबई-ठाणे परिसरात पावसाची शक्यता नसली तरी, ढगाळ वातावरणामुळे धुके आणि थंडीचा जोर काही दिवस कायम राहील, विशेषतः रात्री आणि सकाळी कमी तापमान जाणवेल. बघूया 9 जानेवारी कल्याण डोंबिवली शहररातील हवामानाची काय स्थिती असेल?
advertisement
2/5
कल्याण तालुक्यात आकाश निरभ्र आणि अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता असून, किमान तापमान 20 अंश सेल्सिअस तर कमाल 34 अंश सेल्सिअस असेल. हवामान सुखद आणि कोरडे राहील. ज्यामुळे हवामान सुखद आणि कोरडे राहील, दिवसा उबदार आणि रात्री थंडगार वाटेल.
advertisement
3/5
डोंबिवलीतील आजचे हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 19 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. वाऱ्याचा वेग कमी-जास्त होऊ शकतो.
advertisement
4/5
कल्याण-डोंबिवली ग्रामीण भागात हवामानात बदल होऊन पुन्हा थंडी आणि धुके वाढले आहे. किमान तापमान घट होऊन 15 ते 18 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले आहे. तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. हवामान कोरडे आणि दुपारी उन्हाचा तडाखा जाणवू शकतो, हवेची गुणवत्ता (AQI) खालावल्याने खोकला सर्दी सारखे आजार वाढू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
5/5
बदलापूरमध्ये हवामान स्वच्छ आणि आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. किमान तापमान 18 अंश तर कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस राहील. शहापूर, मुरबाडमध्ये हवामान थंड राहील. किमान तापमान 15 अंश तर कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ आणि हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/Kalyan Dombivli/
Weather Alert: कल्याण-डोंबिवलीची हवा बिघडली, शुक्रवारी अलर्ट, आज कसं असेल हवामान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल