ताप, सर्दी, खोकल्याने त्रस्त आहात? करा 'हे' आयुर्वेदिक उपाय, होणार नाही व्हायरल इन्फेक्शन!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
राज्यात मान्सून दाखल झाल्याने वातावरणात उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे, ज्यामुळे कोरोना आणि इतर व्हायरल आजारांचा प्रसार वेगाने...
advertisement
1/5

सध्या राज्यात मॉन्सून दाखल झाल्यामुळे अनेक भागांमध्ये हवामानात बदल दिसून येतो आहे. काही ठिकाणी पाऊस सुरू झाला आहे, तर काही ठिकाणी, अजूनही पावसाने हजेरी लावलेली नाही. या काळात वातावरणात उष्णता आणि आर्द्रता वाढलेला आहे. त्यामुळे सध्या कोरोना आणि इतर व्हायरल आजारांचा प्रसार लवकर होतो आहे. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांपासून बचावासाठी काय काळजी घ्यावी, हे आपण एका आयुर्वेदतज्ज्ञाकडून समजून घेणार आहोत.
advertisement
2/5
जामनगर येथील केंद्रीय आयुर्वेद संस्थेतील (ITRA) पदार्थ गुणधर्म विभागाचे प्रमुख वैद्य भूपेश पटेल यांनी सांगितले की, "पावसाळ्याच्या आगमनानंतर वातावरणात उष्णता आणि ओलावा वाढतो. त्यामुळे संसर्गजन्य आणि व्हायरल आजार वाढतात. सध्या कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शरीर आजारमुक्त राहावं यासाठी योग्य आहार आणि नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे."
advertisement
3/5
वैद्य पटेल यांच्या मते, सध्याच्या हवामानात चविष्ट, खारट, आंबट आणि गोड पदार्थ टाळावेत. हलका, पचायला सोपा आहार घ्यावा. ज्या गोष्टी शरीरात आजारांना निमंत्रण देतात, अशा गोष्टींपासून दूर राहावं. यासोबतच दररोज व्यायाम केल्यानेही शरीर तंदुरुस्त राहते.
advertisement
4/5
त्यांनी पुढे सांगितले, “दररोज सकाळ-संध्याकाळ व्यायाम करा, कोमट पाणी प्या, दररोज अंघोळ करा आणि नाक, केस, अंग यांची स्वच्छता ठेवा. यामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो. विशेषतः गोड, खारट आणि आंबट पदार्थ कमी केल्याने कोरोना आणि फंगल इन्फेक्शनचा धोका टाळता येतो.”
advertisement
5/5
पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे डासांची संख्या वाढते आणि त्यामुळे आजारांचे प्रमाणही वाढते. म्हणूनच सध्या आहार आणि दिनचर्येकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे वैद्य पटेल यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ताप, सर्दी, खोकल्याने त्रस्त आहात? करा 'हे' आयुर्वेदिक उपाय, होणार नाही व्हायरल इन्फेक्शन!