TRENDING:

ATM Card वर मिळतो फ्रीमध्ये लाखोंचा विमा; क्लेमसाठी हे नियम माहित असणे आवश्यक

Last Updated:
ATM Card Insurance: बँकेकडून एटीएम कार्ड जारी होताच कार्डधारकांना अपघाती विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
advertisement
1/6
ATM Card वर फ्रीमध्ये मिळतो लाखोंचा विमा; क्लेमसाठी हे नियम माहित असणे आवश्यक
सध्याच्या काळात एटीएम कार्ड न वापरणारे मोजकेच लोक असतील. प्रधानमंत्री जन-धन योजनेमुळे (PMJDY), ATM आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. खिशात रोख रक्कम ठेवण्याऐवजी लोक एटीएम कार्ड ठेवण्यास प्राधान्य देतात. आपातकालीन परिस्थिती पैसे मिळवणे इतकाच फायदा एटीएमचा नाही.
advertisement
2/6
तर बँकेकडून तुम्हाला एटीएम कार्ड जारी होताच कार्डधारकांना अपघाती विमा आणि अकाली मृत्यू विमा मिळतो. डेबिट/एटीएम कार्डवरही त्यांना जीवन विमा संरक्षण मिळते हे देशातील बहुतांश लोकांना माहीत नाही.
advertisement
3/6
विम्याची रक्कम तुमच्या कार्डवर अवलंबून असते. काही डेबिट कार्ड 3 कोटी रुपयांपर्यंत मोफत अपघाती विमा संरक्षण देतात. हे विमा संरक्षण विनामूल्य दिले जाते आणि डेबिट कार्ड धारकाकडून कोणताही प्रीमियम आकारला जात नाही किंवा बँकांकडून कोणतेही अतिरिक्त दस्तऐवज विचारले जात नाहीत.
advertisement
4/6
डेबिट कार्डवर मोफत अपघाती विमा संरक्षणासाठी काही अटी व शर्ती आहेत. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे कार्डधारकाला ठराविक कालावधीत त्या डेबिट कार्डद्वारे काही व्यवहार करावे लागतात.
advertisement
5/6
वेगवेगळ्या कार्डांसाठी हा कालावधी बदलू शकतो. काही एटीएम कार्डांवर विमा पॉलिसी सक्रिय करण्यासाठी, कार्डधारकाला 30 दिवसांत किमान एक व्यवहार करावा लागेल.
advertisement
6/6
काही कार्डधारकांना विमा संरक्षण सक्रिय करण्यासाठी शेवटच्या 90 दिवसांत व्यवहार करणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
ATM Card वर मिळतो फ्रीमध्ये लाखोंचा विमा; क्लेमसाठी हे नियम माहित असणे आवश्यक
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल