TRENDING:

Strawberry eating precautions: सावधान! स्ट्रॉबेरीज खात आहात ? घ्या ‘ही’ काळजी अन्यथा किडेसुद्धा जातील पोटात

Last Updated:
Strawberry eating precautions in Marathi: थंडीच्या मोसमात येणारं, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारं फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. ज्यूस, मिल्कशेक, स्मूदी आणि केकसह इतर अन्नपदार्थांच्या सजावटीसाठी स्ट्रॉबेरीज वापर होतो. मात्र स्ट्रॉबेरी खाण्यापूर्वी त्या स्वच्छ धुतल्या नाहीतर स्ट्रॉबेरीजवर असलेली घाण आणि किडे तुमच्या पोटात जाऊन तुम्ही आजारी पडू शकता. अशावेळी स्ट्रॉबेरीज तुमच्या आनंदाचा बेरंग करू शकतील. मात्र स्ट्रॉबेरीज या फक्त पाण्यानेच नाही अस अन्य पदार्थांचा वापर करूनही स्वच्छ करता येतात. जाऊन घेऊयात त्या पद्धती.
advertisement
1/7
Strawberry eating precautions: सावधान! स्ट्रॉबेरीज खात आहात ? घ्या ‘ही’ काळजी
स्ट्रॉबेरीजमध्ये फायबर्स, मँगनीज, पोटॅशियम विविध जीवनसत्वं आणि पॉलिफेनॉलसारखे उत्तम अँटिऑक्सिडंट्स असतात. स्ट्रॉबेरीज या कोलेस्ट्रॉल आणि फॅट फ्री असतात. त्यामुळे स्ट्रॉबेरीज खाल्ल्याने शरीराला विविध फायदे होतात.
advertisement
2/7
स्ट्रॉबेरीच्या बिया फळाच्या बाहेर असतात. त्यामुळे त्या बिया आणि किडे ओळखणं कठीण जातं. त्यामुळे खाण्यापूर्वी स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुवून घेणं महत्त्वाचं ठरतं.
advertisement
3/7
फळं किंवा भाज्या स्वच्छ करण्यासाठी साबण, डिटर्जंट किंवा रसायनांच्या वापरावर अन्न व औषध प्रशासनाने बंदी घातली आहे. तरीही फळांवर कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे स्ट्रॉबेरीज विकत घेतल्यानंतर त्या स्वच्छ धुवून खाणं केव्हाही फायद्याचं ठरतं.
advertisement
4/7
तुम्ही मिठाच्या पाण्याने स्ट्रॉबेरीज स्वच्छ धुवून घेऊ शकता. मात्र ते पाणी कोमट असेल याची काळजी घ्या. कोमट पाण्यात मीठ घालून स्ट्रॉबेरीज 5 ते 10 मिनिटं बुडवून ठेवा. मग नळाखाली त्या स्वच्छ धुवून घ्या.
advertisement
5/7
स्ट्रॉबेरीज स्वच्छ करण्यासाठी तुम्ही व्हिनेगर वापरू शकता. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात एक ते दोन चमचे व्हिनेगर घालून त्या स्ट्रॉबेरीज 20 मिनिटं बुडवून ठेवा. नंतर पाण्याने धुवून आणि कोरडे फडक्याने पुसून घ्या. व्हिनेगरमुळे स्ट्रॉबेरीजच्या आत असलेले कीटक मरून जातील.
advertisement
6/7
स्ट्रॉबेरीजमध्ये असलेले कीटक मारण्यासाठी तुम्ही बेकींग सोड्याचाही वापर करू शकता. कोमट पाण्यात बेकींग सोडा घालून त्यात 10 मिनिटं स्ट्रॉबेरीज बुडवून ठेवा. नंतर स्वच्छ पाण्यात धुवून घ्या. बेकींग सोड्यामुळे कीडे, जंतू, कीटकनाशकाचे अंश निघून जातील.
advertisement
7/7
जर तुम्हाला स्ट्रॉबेरीज दीर्घकाळासाठी वापरायच्या आहेत तर साफ तुम्ही त्या एअरटाईट डब्यात ठेऊ शकता. मत्र साठवण्युपूर्वी त्या पूर्ण कोरड्या असतील याची काळजी घ्या. अन्यथा पाण्याच्या अंशामुळे स्ट्रॉबेरीज खराब होऊ शकतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Strawberry eating precautions: सावधान! स्ट्रॉबेरीज खात आहात ? घ्या ‘ही’ काळजी अन्यथा किडेसुद्धा जातील पोटात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल