Cleaning Tips : पिरीएड्सचे हट्टी डाग 5 मिनिटांत होतील गायब, 'हे' भन्नाट हॅक्स वापरून पाहा..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Home remedies to remove period stains : मासिक पाळीच्यावेळी कपड्यांवर डाग पडणे सामान्य आहे, परंतु जर ते त्वरित आणि योग्यरित्या स्वच्छ केले नाहीत तर ते कपड्यावर कायमचे राहू शकतात. लोक अनेकदा घाबरतात आणि कपड्यांवर साबण किंवा डिटर्जंट घासतात, मात्र तरीही हे डाग निघत नाहीत. तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल, तर या 5 सोप्या घरगुती उपायांबद्दल जाणून घ्या. हे उपाय कपड्याचे नुकसान न करता डाग काढून टाकू शकतात.
advertisement
1/7

लिंबू, मीठ, पांढरा व्हिनेगर, बेकिंग सोडा, हायड्रोजन पेरॉक्साइड आणि डाग रिमूव्हर यासारखे घरगुती उपाय मासिक पाळीचे डाग सहज कडून टाकू शकतात. याने कपड्याचे कोणतेही नुकसानदेकील होत नाही. चला तर मग त्यांच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
advertisement
2/7
लिंबाचा रस नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो आणि मीठ सौम्य स्क्रबर म्हणून काम करतो. दोन्ही मिसळा आणि डाग असलेल्या भागावर लावा, नंतर थोड्या वेळाने ब्रशने हळूवारपणे स्क्रब करा. यामुळे केवळ डागच नाही तर वास देखील निघून जाईल, ज्यामुळे कपडे पुन्हा स्वच्छ आणि ताजे दिसतील.
advertisement
3/7
जर डाग नवीन असेल तर पांढरा व्हिनेगर जलद परिणाम देऊ शकतो. अर्धा कप व्हिनेगर एक कप पाण्यात मिसळा आणि डाग असलेला भाग 15-20 मिनिटे भिजवा. नंतर साध्या पाण्याने धुवा. व्हिनेगर कापडाच्या गुणवत्तेला हानी पोहोचवल्याशिवाय डाग सैल करतो आणि काढून टाकतो.
advertisement
4/7
कपड्यांवरील मासिक पाळीचे डाग काढून टाकण्यासाठी बेकिंग सोडा थंड पाण्यात मिसळा आणि पेस्ट बनवा. ही पेस्ट कपड्याला लावा. हलक्या हाताने घासून घ्या. ते कमीत कमी 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर तुमच्या नेहमीच्या डिटर्जंटने धुवा.
advertisement
5/7
बाजारात असे अनेक डाग रिमूव्हर उपलब्ध आहेत, जे मासिक पाळीचे डाग काढून टाकू शकतात. तुम्ही हायड्रोजन पेरोक्साइड देखील वापरून पाहू शकता. डागावर हायड्रोजन पेरोक्साइड लावा, ते 30 मिनिटे राहू द्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा.
advertisement
6/7
आता, पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला तुमच्या कपड्यांवर मासिक पाळीचे डाग दिसतील तेव्हा तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय हे हॅक्स वापरू शकता. ते डाग सहजपणे काढून टाकतील आणि तुमचे कपडे नव्यासारखे दिसतील.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Cleaning Tips : पिरीएड्सचे हट्टी डाग 5 मिनिटांत होतील गायब, 'हे' भन्नाट हॅक्स वापरून पाहा..