TRENDING:

Coronavirus in India : कोव्हिड लस घेतली तरी कोरोनोचा धोका आहे का?

Last Updated:
Coronavirus In India : कोरोना महासाथीच्या काळात कोरोना लस घेतली आहे, मग आता पसरत असलेल्या कोरोनाचा धोका तर नाही ना? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
advertisement
1/5
Coronavirus in India : कोव्हिड लस घेतली तरी कोरोनोचा धोका आहे का?
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. कोरोनाची महासाथ होती तेव्हा जवळपास सगळ्यांनी कोरोना लस घेतली. त्यामुळे आता कोरोना आला तरी कोरोनाचा धोका आहे का? कोरोना होऊ शकतो का? असा प्रश्न पडणं साहजिकच आहे.
advertisement
2/5
सध्या भारतातील परिस्थिती नियंत्रणात आहे, परंतु जर खबरदारी घेतली नाही तर धोका वाढू शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. म्हणूनच सर्व राज्य सरकारांनी आतापासून तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पॉझिटिव्ह नमुन्याचे जीनोम सिक्वेन्सिंग केलं जात आहे. सरकार यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि आरोग्य मंत्रालय वारंवार त्याचा आढावा घेत आहे.
advertisement
3/5
वृद्ध, मधुमेह, हृदय किंवा फुफ्फुसाचा आजार यासारख्या आधीच आजार असलेले लोक आणि लसीकरण न झालेल्यांना संसर्गाचा धोका जास्त असतो. कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या लोकांना देखील धोका असतो. मुलांमध्ये आणि निरोगी तरुणांमध्ये याचे परिणाम सौम्य असल्याचे दिसून आले आहे.
advertisement
4/5
बूस्टर डोस घेणाऱ्या लोकांना संसर्गाची शक्यता कमी आणि सौम्य लक्षणं आढळून आली आहेत. म्हणून, जर तुम्ही कोविड लस घेतली असेल, तर जास्त घाबरण्याची गरज नाही.
advertisement
5/5
बूस्टर डोस घ्या, गर्दी टाळा, मास्क घाला आणि नियमित तपासणी करा. जर तुम्हाला कुठेही संसर्गाची लक्षणं दिसली तर ताबडतोब आरटीपीसीआर चाचणी करून घ्या. रुग्णालयात जाऊन डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घ्या आणि तिथं उपचार घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Coronavirus in India : कोव्हिड लस घेतली तरी कोरोनोचा धोका आहे का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल