Diabetes Tips : डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग हे 6 होममेड ज्युस प्या, तज्ञांनीच दिला सल्ला..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Green Juice For Control Diabetes : बदलत्या जीवनशैलीत मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. त्यात व्यस्ततेमुळे लोकांना पौष्टिक अन्न आणि नियमित व्यायाम करता येत नाही यामुळे हा त्रास आणखी वाढतो आणि जीवावर संकट येतं. म्हणूनच ज्या लोकांना मधुमेह आहे, त्यांना त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. आज आम्ही तुम्हाला अशा 6 ज्यूसबद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही तुमच्या आहारात सामील केल्यास तुमची ब्लड शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहील.
advertisement
1/7

मधुमेहापासून पूर्णपणे मुक्त होणे शक्य नाही, परंतु जीवनशैली आणि आहार बदलून ते नियंत्रित केले जाऊ शकते. रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी लोक अनेक पदार्थ खातात. परंतु, काही घरगुती हिरवे ज्युस अधिक फायदेशीर मानले जातात. हे शरीरात इन्सुलिन भरण्याचे काम करतात. लखनऊ येथील हिम्स हॉस्पिटलच्या सल्लागार आहारतज्ञ, शितल गिरी यांच्याकडून याबद्दल सविस्तर माहिती घेऊया.
advertisement
2/7
ड्रमस्टिक ज्यूस : डायटीशियन शीतल गिरी सांगतात की, ड्रमस्टिक म्हणजेच मोरिंगा किंवा शेवग्याच्या ज्यूसमध्ये अनेक पोषक तत्व असतात. मोरिंगा ज्यूस अनेक रोगांवर खूप फायदेशीर आहे. यामध्ये अनेक अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हा ज्यूस रामबाण उपाय आहे. याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित राहते.
advertisement
3/7
पालक ज्यूस : पालक पोषक तत्वांचा खजिना आहे. त्यात अनेक जीवनसत्त्वे, खनिजे आणि अमीनो ॲसिड मुबलक प्रमाणात असतात. पालकाचा ज्यूस अनेक रोगांवर खूप फायदेशीर आहे. अशक्तपणा आणि संधिवात यासह अनेक रोगांमध्ये त्याचा वापर करण्याची शिफारस केली जाते. पालकाचा रस मधुमेह नियंत्रित करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. हे प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
advertisement
4/7
भोपळ्याचा ज्यूस : आहारतज्ज्ञांच्या मते, भोपळ्याचा ज्यूस पचनासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये फायबरसह अनेक पोषक घटक असतात. भोपळ्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. हे रक्तातील साखर नियंत्रित करते.
advertisement
5/7
कोरफडीचा ज्यूस : तज्ज्ञांच्या मते, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई सारखे अनेक अँटीऑक्सिडंट गुणधर्म कोरफडीमध्ये आढळतात. हे एक औषध आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडीच्या ज्यूसचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
advertisement
6/7
आवळा ज्यूस : आवळ्याचा ज्यूस मधुमेहाच्या रुग्णांसाठी आरोग्यदायी पर्यायांपैकी एक असू शकतो. कारण आवळ्यामध्ये अनेक विशेष गुणधर्म आढळतात, जे रक्तातील साखरेची पातळी कमी करतात आणि त्यासोबतच यामध्ये असलेले अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
advertisement
7/7
कारल्याचा ज्यूस : कारल्याचा ज्यूस पिणे रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. ज्या मधुमेही रुग्णांना कारल्याचा ज्यूस नियमित पिण्याची सवय असते, ते साखर कमी करणाऱ्या औषधांवर कमी प्रमाणात अवलंबून असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Diabetes Tips : डायबिटीज कंट्रोलमध्ये ठेवायचंय? मग हे 6 होममेड ज्युस प्या, तज्ञांनीच दिला सल्ला..