Kitchen Tips : तुम्हाला माहितीये का, मायक्रोव्हेव आणि ओव्हनमध्ये नेमका काय आहे फरक?
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
मायक्रोव्हेव आणि ओवन या उपकरणांचा भारतीय स्वयंपाक घरात उपयोग वाढला आहे. परंतु मायक्रोव्हेव किंवा ओवन खरेदी करू इच्छिणाऱ्या अनेक ग्राहकांना यामधील फरक माहित नसतो. तेव्हा मायक्रोव्हेव आणि ओवन हे दोन जवळपास एक सारख्या दिसणाऱ्या उपकरणांमध्ये नेमका कोणता फरक आहे तसेच याचा उपयोग कशा करता केला जातो याविषयी जाणून घेऊयात.
advertisement
1/5

बाजारात उपलब्ध असलेल्या मायक्रोवेव्ह ओव्हनचे दोन मुख्य प्रकार आहेत. एक म्हणजे ओटीजी ओव्हन आणि मायक्रोवेव्ह ओव्हन. या दोन ओव्हनमध्ये खूप फरक आहे. आज आम्ही तुम्हाला ओटीजी ओव्हन आणि मायक्रोवेव्ह ओव्हनमधील फरक सांगणार आहोत.
advertisement
2/5
ओटीजी ओव्हन ही पारंपारिक ओव्हनची छोटी आवृत्ती आहे. ओटीजी म्हणजे ओव्हन, टोस्टर आणि ग्रिल. OTG ओव्हनमध्ये अन्न गरम करण्यासाठी गरम कॉइलचा वापर केला जातो. यात एक थर्मोस्टॅट देखील आहे जे तापमान नियंत्रित करते जेणेकरून अन्न योग्यरित्या शिजवले जाते.
advertisement
3/5
मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये स्वयंपाक करण्यास जास्त वेळ लागत नाही. त्यात कुकिंग, ग्रिलिंग, बेकिंग आणि डीफ्रॉस्टिंग करता येते. याशिवाय मायक्रोवेव्ह ओव्हनमध्ये ऑटो कुक फंक्शन देखील असतो.
advertisement
4/5
कुटुंब मोठे असल्यास ओटीजी ओव्हन तुमच्यासाठी योग्य ठरेल. यात मायक्रोवेव्ह ओव्हनपेक्षा जास्त जागा असते. मायक्रोवेव्ह ओवनच्या आतील फिरणारा पृष्ठभाग हा लहान असतो त्यामुळे त्यात अनेक लोकांसाठी अन्न शिजवता येत नाही.
advertisement
5/5
प्री-हीटिंगबद्दल बोलायचे झाले तर, ओटीजी ओव्हन गरम होण्यास 15-20 मिनिटे लागतात परंतु मायक्रोवेव्ह ओपन सुमारे 5 मिनिटांत प्रीहीट होते. मायक्रोवेव्हचा वापर ओटीजी ओव्हन म्हणून केला जाऊ शकतो कारण त्यात ओटीजीप्रमाणे ग्रिलिंग आणि बेकिंगचा पर्याय आहे, परंतु मायक्रोवेव्हप्रमाणे ओटीजीमध्ये पुन्हा जेवण गरम करता येत नाही आणि डीफ्रॉस्टिंग करता येत नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Kitchen Tips : तुम्हाला माहितीये का, मायक्रोव्हेव आणि ओव्हनमध्ये नेमका काय आहे फरक?