Walnut-Akhrot : फक्त 1 अक्रोड तुमच्या शरीरात काय कमाल करू शकतो, फायदे जाणून घ्याल तर, कधीच टाळणार नाही खाणं
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Do you know what happens if you eat one walnut every day : सकाळी उठून एक तरी अक्रोड नक्की खा, फायदे जाणून नक्कीच चकीत व्हाल
advertisement
1/6

आपलं शरीर निरोगी राहावं असं वाटत असेल, तर आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये थोडे बदल करणं गरजेचं आहे. रोज सकाळी आपण वेगवेगळे पदार्थ खातो, पण त्यात काही पौष्टिक पदार्थ जोडल्यास शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात.
advertisement
2/6
तुम्ही रोज सकाळी बदाम खाताय का? जर खात असाल तर उत्तम! कारण या छोट्या सुकामेव्याचे फायदे खूप आहेत. बदाम हाडांना मजबूत ठेवतात, मेंदूची कार्यक्षमता वाढवतात आणि त्वचेला चमकदार बनवतात. मानसिक आरोग्यासाठीही ते फायदेशीर आहेत. त्यामुळे रोज सकाळी बदाम खाण्याची सवय लावून घ्या.
advertisement
3/6
बदामासोबतच अक्रोडही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अक्रोडमध्ये असंख्य पोषक तत्त्व असतात जे पचनसंस्था सुधारतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतात. तज्ज्ञांच्या मते, अक्रोड कोलन कॅन्सर टाळण्यास मदत करतात. त्यामुळे आठवड्यातून किमान ४-५ दिवस तरी अक्रोड खाण्याचा प्रयत्न करा.
advertisement
4/6
अक्रोड कसे खावेत? तज्ज्ञ सांगतात की, अक्रोड भिजवून खाणे अधिक फायदेशीर असते. तुम्ही दूधासोबतही अक्रोड खाऊ शकता. आपल्या रोजच्या आहारात अक्रोडचा समावेश करा आणि त्याचे शरीरावर होणारे बदल स्वतः अनुभवा.
advertisement
5/6
अक्रोडमध्ये कोणते पोषक तत्त्व असतात? अक्रोडमध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, फॉस्फरस, लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे ते हाडं आणि दात मजबूत करतात.
advertisement
6/6
पोषणतज्ज्ञ वास्वती दास यांच्या मते, अक्रोड ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे आणि ते हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर आहेत. त्यामुळे रोज किमान एक भिजवलेला अक्रोड खाण्याची सवय लावून घ्या. काळे आणि तपकिरी अशा दोन्ही प्रकारचे अक्रोड आरोग्यासाठी चांगले असतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Walnut-Akhrot : फक्त 1 अक्रोड तुमच्या शरीरात काय कमाल करू शकतो, फायदे जाणून घ्याल तर, कधीच टाळणार नाही खाणं