Success Story: बायकोचं ऐकायचं असतं! ज्ञानेश्वरनं नोकरी सोडली, आता लाखात कमाई
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Success Story: सध्याच्या काळात अनेकजण नोकरीच्या शोधात असतात. परंतु, नाशिकमधील तरुणाने नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरू केला. आता महिन्याला लाखात कमाई आहे.
advertisement
1/7

सध्याच्या काळात अनेकजण नोकरीच्या मागे लागतात. परंतु, नाशिकच्या एका तरुणानं पत्नीचं ऐकून नोकरी सोडली आणि स्वत:चा व्यवसाय सुरू केला. मोठ्या कष्टानं आणि मेहनतीनं व्यवसाय भरभराटीला आला आहे. आता त्यांची महिन्याची कमाई लाखाच्या घरात आहे.
advertisement
2/7
नाशिकचा ज्ञानेश्वर आदमाने यांनी आयटीआयचं शिक्षण घेतलं आणि एका कंपनीत काम सुरू केलं. खासगी कंपनी असली तरी पगार चांगला होता. परंतु, स्वत:चा एखादा व्यवसाय असावा अशी त्यांच्या पत्नीची इच्छा होती. त्यासाठी ज्ञानेश्वरने थेट नोकरीचा राजीनामा दिला.
advertisement
3/7
ज्ञानेश्वर आणि त्यांच्या पत्नीने रबडी बनवून विकण्याचा निर्णय घेतला. श्रीराम रबडीवाला या नावाने रबडी विक्रीच्या व्यवसाय सुरू केला. त्यांच्याकडे तब्बल 12 ते 15 प्रकारच्या स्वादिष्ट रबडी मिळतात.
advertisement
4/7
ज्ञानेश्वर यांचा श्रीराम रबडीवाला हा ब्रँड लवकरच फेमस झाला. नाशिककर आवर्जून याठिकाणी रबडीचा आस्वाद घेण्यासाठी येऊ लागले. याच लोकप्रियतेमुळे अल्पावधीतच श्रीराम रबडीवाला या नावाने 3 आऊटलेट देखील सुरू झाले आहेत.
advertisement
5/7
रबडीसाठी लागणारं दूध तसेच इतर साहित्य हे उच्च प्रतीचं असतं. यात वापरलं जाणारे दूध हे लॅब टेस्टिंग करून वापरलं जातं. तसेच आम्ही 12 ते 15 फ्लेवरच्या रबडी बनवतो. त्यामुळे नाशिककरांची चांगली पसंती आमच्या रबडीला मिळत असल्याचं ज्ञानेश्वर सांगतात.
advertisement
6/7
रबडी विक्रीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर यांना महिन्याला 1 लाखापर्यंत कमाई होतेय. नोकरी सोडून व्यवसाय सुरू केल्याचे समाधान आहे, असं ज्ञानेश्वर सांगतात.
advertisement
7/7
नाशिकमधील नाशिक रोड बारील बिटको चौफुलीला तसेच त्रिमूर्ती चौक आणि आणि मुख्य शाखा ही नारायण बापू चौक जेल रोड या ठिकाणी श्रीरॅम रबडी या नावाने उपलब्ध आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Success Story: बायकोचं ऐकायचं असतं! ज्ञानेश्वरनं नोकरी सोडली, आता लाखात कमाई