Watermelon: कलिंगडाचे जबरदस्त फायदे; पोटदुखी, BP, वजन होतं कमी!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उन्हाळ्यात आपण शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी विविध ज्यूस पितो, फळं खातो. परंतु हायड्रेट राहण्यासह शरिराला वेगवेगळे पौष्टिक तत्त्व मिळणंही आवश्यक आहे. त्यासाठी कलिंगड उत्तम मानलं जातं.
advertisement
1/5

कलिंगडात भरपूर प्रमाणात पाणी असतंच, शिवाय त्यात असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे शरीर सुदृढ राहतं. त्यातून भरपूर पोषक तत्त्व मिळतात. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीतील डॉक्टर स्मिता श्रीवास्तव (बीएएमएस आयुर्वेद) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
2/5
डॉक्टरांनी सांगितलं की, कलिंगडमध्ये 90 टक्के पाणी असतं. शिवाय त्यात फायबर, पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि सायड्रालाइन अॅमिनो अॅसिड भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे उन्हाळ्यात दररोज कलिंगड खाल्ल्याने शरीर निरोगी राहतं.
advertisement
3/5
पोटदुखी, डिहायड्रेशन, ब्लड प्रेशर, चक्करसारखं वाटणं, इत्यादींवर हे फळ रामबाण मानलं जातं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलिंगड खाल्ल्याने वजन झटपट कमी होतं.
advertisement
4/5
डॉ. स्मिता श्रीवास्तव सांगतात की, दररोज कमीत कमी 250 ते 500 ग्रॅम कलिंगड खावं. त्यामुळे साथीच्या रोगांपासून शरिराचं रक्षण होतं.
advertisement
5/5
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Food/
Watermelon: कलिंगडाचे जबरदस्त फायदे; पोटदुखी, BP, वजन होतं कमी!