हाडांपासून ते डोळ्यांपर्यंत... शेकडो आजारावर 'ही' भाजी ठरते रामबाण उपाय; आजपासूनच करा आहारात समावेश
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
ब्रोकोली ही अत्यंत पोषणमूल्य असलेली भाजी आहे. डॉ. पॉल रॉबसन यांच्या मते, ब्रोकोलीमध्ये फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे रक्तदाब नियंत्रित करतात आणि...
advertisement
1/6

ब्रोकोली ही एक अत्यंत आरोग्यदायी भाजी आहे. पचन सुधारण्यासाठी, डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी, हाडे मजबूत करण्यासाठी आणि इतर अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ब्रोकोलीचे महत्त्वाचे ठरते.
advertisement
2/6
डॉ. पॉल रॉबसन मेहदी म्हणतात की, ब्रोकोलीमधील फायबर, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स रक्तदाब नियंत्रित करतात आणि हृदयरोगाचा धोका कमी करतात.
advertisement
3/6
ब्रोकोली पचन सुधारण्यास मदत करते. ब्रोकोलीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या, बद्धकोष्ठता इत्यादींपासून आराम मिळतो.
advertisement
4/6
ब्रोकोली डोळ्यांचे आरोग्य सुधारते. ब्रोकोलीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन नावाचे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे मॅक्युलर डीजेनरेशनसारख्या डोळ्यांच्या आजारांना प्रतिबंध करतात.
advertisement
5/6
ब्रोकोली हाडांसाठीही चांगली आहे. ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन के आणि कॅल्शियम असते, जे हाडे मजबूत करतात आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी करतात.
advertisement
6/6
ब्रोकोली रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते. ब्रोकोलीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ती मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
हाडांपासून ते डोळ्यांपर्यंत... शेकडो आजारावर 'ही' भाजी ठरते रामबाण उपाय; आजपासूनच करा आहारात समावेश