TRENDING:

पार्टी करा स्वस्तात मस्त, युनिक थीम आणि बरचं काही, ठाण्यातील ठिकाण माहितीये का?

Last Updated:
ठाण्यातील ‘अजब कॅफे का गजब थिएटर’ हा कॅफे सध्या त्यांच्या युनिक थीममुळे ठाणेकरांच्या पसंतीस उतरतोय.
advertisement
1/7
पार्टी करा स्वस्तात मस्त, युनिक थीम आणि बरचं काही, ठाण्यातील ठिकाण माहितीये का?
बर्थडे पार्टी असू देत किंवा इतर फॅमिली फंक्शन या सगळ्यांसाठीच अनेकांना प्रायव्हेट स्पेस हवी असते. जिथे ते त्यांच्या माणसांबरोबर तो क्षण जगू शकतील. ठाण्यातील ‘अजब कॅफे का गजब थिएटर’ हा कॅफे सध्या त्यांच्या युनिक थीममुळे ठाणेकरांच्या पसंतीस उतरतोय.
advertisement
2/7
ठाण्यातील संकेत आणि नेहा या दोघांनी मिळून सुरू केलेल्या या कॅफेमध्ये फक्त 799 मध्ये तुम्हाला हवी ती वेब सिरीज किंवा हवा तो चित्रपट तुमच्या कुटुंबासोबत किंवा पार्टनर सोबत 2 तास 45 मिनिटं पाहायला मिळणार आहे.
advertisement
3/7
संकेतला कॉलेजमध्ये असल्यापासूनच चित्रपट सृष्टी फार आवडायची. यातच काम करण्याची त्याची इच्छा होती. नेहाचे सुद्धा हॉस्पिटॅलिटीमधून शिक्षण झाले होते.
advertisement
4/7
यामुळे त्या दोघांनी मिळून असा युनिक कॅफे सुरू करण्याचा निर्णय घेतला. बर्थडे पार्टी, फेअरवेल पार्टी, ब्राईड टू बी पार्टी, सक्सेस पार्टी, एनिवर्सरी असे सगळे क्षण तुम्ही इथे एन्जॉय करू शकता.
advertisement
5/7
“अनेकांना आपला आनंद प्रायव्हेट जागेमध्ये आणि कमी लोकांमध्ये साजरा करायला आवडतो. अशा सगळ्यांसाठीच आम्ही हा कॅफे सुरू केलाय. अनेक जण आमच्याकडे येतात आणि असेच सांगतात की आम्ही अशाच कॅफेच्या शोधात होतो,” असे नेहाने सांगितले.
advertisement
6/7
‘अजब कॅफे का गजब थिएटर’ इथे मिळणाऱ्या फुड मध्ये सुद्धा तुम्हाला खूप व्हरायटी मिळेल. अगदी मॅगी पासून ते मोइतो आणि कॉफी पर्यंत सगळ्या पदार्थांची टेस्ट अगदी कमाल आहे.
advertisement
7/7
ठाण्यापासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर असणाऱ्या माजीवाडा गावामध्ये फातिमा चर्चच्या अगदी बाजूलाच हा ‘अजब कॅफे का गजब थिएटर’ आहे. तुम्हाला सुद्धा तुमच्या फॅमिली मेंबर किंवा फ्रेंड्स बरोबर मिनी पार्टी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला आधी कॉन्टॅक्ट करून तुमचा स्लॉट बुक करावा लागेल. इथे तुम्हाला वेगवेगळे ओटीटी प्लॅटफॉर्म सुद्धा पाहायला मिळतील. त्यातून तुम्हाला आवडेल तो चित्रपट किंवा वेबसिरीज पाहू आणि एन्जॉय करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
पार्टी करा स्वस्तात मस्त, युनिक थीम आणि बरचं काही, ठाण्यातील ठिकाण माहितीये का?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल