TRENDING:

Health Tips : भात खाऊनही वाढणार नाही शुगर आणि वजन! फक्त अशा पद्धतीने शिजवा तांदूळ

Last Updated:
भारतीय लोकांचे संपूर्ण अन्न म्हणजे वरण-भात-भाजी आणि चपाती. वरण आणि भाताशिवाय तर बऱ्याच लोकांचे जेवण अपूर्ण असते. यामुळे भूक तर शमते. मात्र, आपल्या बऱ्याच लोकांना समस्या ही आहे की दुपारी भात खाल्ल्यानंतर आपल्याला झोप येऊ लागते, वजन वाढण्याची समस्या होते. चला जाणून घेऊया यामागचे कारण..
advertisement
1/6
भात खाऊनही वाढणार नाही शुगर आणि वजन! फक्त अशा पद्धतीने शिजवा तांदूळ
इंडिया एक्सप्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, भात शिजवण्याआधी तांदूळ पाण्यात भिजवणे ही एक स्मार्ट युक्ती आहे. तांदूळ पाण्यात भिजवण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे तुम्हाला झोपेत कोणतीही अडचण येणार नाही. याशिवाय पचनसंस्थाही निरोगी राहते.
advertisement
2/6
तांदूळ पाण्यात भिजवून ठेवल्याने त्यातील पोषक तत्व चांगल्या प्रकारे शोषले जातात. याशिवाय त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील प्रभावित होतो. GI अन्नातील कार्बोहायड्रेट्स <a href="https://news18marathi.com/lifestyle/diabetics-should-eat-these-5-foods-for-breakfast-to-control-blood-sugar-level-whole-day-mhpj-1174297.html">रक्तातील साखरेची</a> पातळी किती लवकर वाढवतात हे मोजते.
advertisement
3/6
तांदूळ भिजवण्याचे फायदे : तांदूळ भिजवल्याने एन्झाईमॅटिक ब्रेकडाउन होते. असे केल्याने तांदळामध्ये असलेले कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट तुटून त्याचे साध्या साखरेत रूपांतर होते. यामुळे आपले शरीर हे पौष्टिक घटक सहजपणे शोषून घेते. यामुळे GI देखील कमी होतो आणि जेव्हा ते कमी होते तेव्हा तुमची रक्तातील साखर देखील नियंत्रणात राहते.
advertisement
4/6
भात शिजवताना या गोष्टी लक्षात ठेवा : तांदूळ भिजवण्याचे अनेक फायदे आहेत. <a href="https://news18marathi.com/lifestyle/why-does-sugar-level-increase-in-summer-doctor-tells-connection-between-heat-and-diabetes-mhpj-1181047.html">मधुमेहाच्या रुग्णांसाठी</a> ही एक चांगली पद्धत मानली जाते. मात्र, ते 3-4 तास पाण्यात सोडू नका. असे केल्याने जीवनसत्त्वे आणि खनिजे पाण्यात विरघळतील आणि पाण्यासोबत वाहून जातील.
advertisement
5/6
जास्तवेळ पाण्यात तांदूळ भिजवल्याने त्यातील पोषकतत्त्वे नष्ट होऊ शकतात. जर तुम्हाला तांदूळ भिजवायचा नसेल तर तुम्ही तो फक्त पाण्याने धुवून शिजवू शकता. त्यामुळे भाताचा पोत योग्य राहतो.
advertisement
6/6
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. आपण कोणत्याही पदार्थाचं सेवन करण्याआधी याबद्दल डॉक्टर किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Tips : भात खाऊनही वाढणार नाही शुगर आणि वजन! फक्त अशा पद्धतीने शिजवा तांदूळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल