TRENDING:

सतत पित्ताचा त्रास होतोय? काळजी नको! हे 7 घरगुती उपाय देतील लगेच आराम

Last Updated:
सध्याच्या काळात अनेकांना पित्ताचा त्रास सतावत असतो. त्यांच्यासाठी जिरे, बडीशेप आणि इतर 7 घरगुती उपाय रामबाण ठरू शकतात.
advertisement
1/9
सतत पित्ताचा त्रास होतोय? काळजी नको! हे 7 घरगुती उपाय देतील लगेच आराम
पित्ताचा त्रास ही सध्याच्या काळात अनेकांना जाणवत असणारी आरोग्याची समस्या आहे. पित्तदुखीलाच पित्ताशयाचे खडे असेही म्हणतात. पित्ताशयातील खडे यकृताच्या खाली राहतात आणि खूप वेदनादायक असू शकतात. पित्ताची सर्वात मोठी ओळख ही व्यक्तीला अस्वस्थ वाटणे आणि छातीत जळजळ होणे असते. कधी कधी छातीच्या खालीही वेदना होतात. पित्ताशयाची ही समस्या काही घरगुती उपायांनीही कमी करता येते. याबाबत <a href="https://news18marathi.com/mumbai/">मुंबईतील</a> आहारतज्ज्ञ प्रणाली बोबडे यांनी 7 घरगुती उपाय सांगितले आहेत.
advertisement
2/9
कोमट पाणी पिणे: पित्ताचा त्रास होत असताना कोमट पाणी प्यायल्याने त्वरित आराम मिळतो. हे पाणी पचनसंस्थेतील अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.
advertisement
3/9
जिरे आणि धन्याचे पाणी: 1 चमचा जिरे आणि 1 चमचा धन्याचे बी 1 ग्लास पाण्यात उकळा. हे पाणी थंड झाल्यावर प्या. पित्ताचा त्रास कमी होण्यास मदत होते.
advertisement
4/9
आवळा: आवळ्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. आवळ्याचा रस पिणे किंवा आवळा चघळणे पित्ताचा त्रास कमी करू शकते.
advertisement
5/9
मध आणि लिंबू: एका ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध आणि अर्ध्या लिंबाचा रस घालून प्या. हे मिश्रण शरीरातील अ‍ॅसिडिटी कमी करण्यास मदत करते.
advertisement
6/9
बडीशेप: बडीशेप चघळल्याने पचन सुधारते आणि पित्ताचा त्रास कमी होतो. बडीशेप पाण्यात उकळून ते पाणी पिणे देखील फायदेशीर आहे.
advertisement
7/9
काकडी: काकडी खाणे किंवा काकडीचा रस पिणे याने शरीर थंड राहते आणि पित्त कमी होते.
advertisement
8/9
तुळशीची पाने: तुळशीची काही पाने चघळा किंवा तुळशीच्या पानांचा रस प्या. तुळशी अ‍ॅसिडिटी कमी करण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करते.
advertisement
9/9
दरम्यान, घरगुती उपायांनी पित्ताचा त्रास कमी करता येतो. त्यामुळे छातीत जळजळणे किंवा पित्ताची इतर लक्षणे जाणवल्यास घरगुती उपाय करणे फायदेशीर ठरते. (प्रियांका जगताप, प्रतिनिधी)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
सतत पित्ताचा त्रास होतोय? काळजी नको! हे 7 घरगुती उपाय देतील लगेच आराम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल