Ayurveda: खोकल्यानं हैराण केलंय? तुमच्या घरातलाच हा पदार्थ करेल काम, तब्बल 8 आजारांवर रामबाण!
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Jeshthamadh Benefits: आपल्याकडे जंगलातील जडीबुटींचा वापर विविध आजारांवरील औषध म्हणून पूर्वापार केला जातो. बहुतेकांच्या घरात असणारा एक पदार्थ जवळपास सात ते आठ आजारांवर रामबाण आहे.
advertisement
1/9

भारतात पूर्वापार आयुर्वेदाला अतिशय महत्त्व असून जंगलातील जडीबुटींचा वापर करून आपल्या पूर्वजांनी अनेक औषधांची निर्मिती केलीये. आता याच जडीबुटींचे उपयोग वैज्ञानिक प्रयोगातूनही सिद्ध झाले आहेत. यापैकीच एक म्हणजे बहुतेकांच्या घरात असणारा ज्येष्ठमध होय.
advertisement
2/9
प्रत्येक घरात सहज उपबल्ध असणारा ज्येष्ठमध आयुर्वेदिक दृष्ट्या अत्यंत गुणकारी मानला जातो. यात अनेक आयुर्वेदिक गुणधर्म असून एक नव्हे तर सात ते आठ आजारांवर ज्येष्ठमध रामबाण मानला जातो. याबाबतच डोंबिवलीतील आयुर्वेदिक डॉक्टर श्रेयस कळसकर यांनी माहिती दिलीये.
advertisement
3/9
शिक्षक, प्राध्यापक किंवा कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना अधिक बोलावे लागते. सतत बोलल्याने त्यांच्या स्वर यंत्रणेला त्रास होतो. बऱ्याचदा आवाज बसण्यासारखे त्रास देखील उद्भवतात. अशावेळी ज्येष्ठ मध तोंडात चघळले तर या त्रासापासून आराम मिळतो.
advertisement
4/9
सध्या पावसाळा असून खोकल्याची साथ वाढलेली आहे. हा खोकला कमी व्हावा यासाठी मधात ज्येष्ठमधाची पावडर टाकून बनवलेले चाटण दिवसातून दोन ते तीन वेळा चाटावे. यामुळे लगेच आराम मिळतो, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
5/9
काही वेळा तिखट पदार्थ खाल्ल्यानंतर जळजळ होते. तसेच पित्तामुळे देखील पोटात किंवा छातीत जळजळते. तेव्हा ज्येष्ठ मधाची पावडर पाण्यात आणि विशेषतः तुपात घोळवून खाल्ल्यास ही जळजळ ताबडतोब थांबते.
advertisement
6/9
ज्येष्ठमध हे बुद्धिवर्धक रसायन असल्याचे वर्णन आयुर्वेदात आहे. त्यामुळे दुधात टाकून रोज सकाळी किंवा सायंकाळी ते दूध प्यायले तर विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल. ज्येष्ठमध हे चवीला गोड असल्याने ताकद देणारे आहे, असंही डॉक्टर कळसकर सांगतात.
advertisement
7/9
तोंडात अल्सर, छाले पडणे किंवा तोंड आले असेल तर ज्येष्ठ मधाची पावडर करून ती मधात उगळावी आणि त्या ठिकाणी लावावी. त्याचा चांगला परिणाम होतो आणि आराम मिळतो.
advertisement
8/9
उन्हाळ्यात ज्येष्ठमध आणि चंदन उगाळून चेहऱ्याला लावले तर सन बर्न होत नाही. तसेच कुठे भाजल किंवा चटका लागला तरी ज्येष्ठ मधाची पवडर तुपात घोळवून ती त्या जखमेवर लावावी, यामुळे आराम पडतो, असे कळसकर सांगतात.
advertisement
9/9
(टीप : बातमीतील मतं ही तज्ज्ञांची आयुर्वेदिक माहितीच्या आधारे वैयक्तिक मतं आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Ayurveda: खोकल्यानं हैराण केलंय? तुमच्या घरातलाच हा पदार्थ करेल काम, तब्बल 8 आजारांवर रामबाण!