Teera Kamat: अनुवंशिक आजार अन् 16,00,00,000 रुपयांचं एक इंजेक्शन, आता कशीये चिमुकल्या तीराची तब्येत?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Teera Kamat: अनुवांशिक आजारासाठी मुंबईच्या तीरा कामतला तब्बल 16 कोटी रुपयांचं इंजेक्शन दिलं होतं. आता 4 वर्षांनी तिच्या प्रकृतीत बदल जाणवत आहेत.
advertisement
1/7

एका इंजेक्शनची किंमत 16 कोटी रुपये! ऐकायला जरी अविश्वसनीय वाटत असले तरी, ही रक्कम एका चिमुकलीच्या जीवनासाठी मोलाची ठरली. चार वर्षांपूर्वी स्पायनल मस्क्युलर अँट्रॉफी (SMA) या दुर्मीळ अनुवांशिक आजाराशी झुंज देणाऱ्या तीरा कामतला जोलगेंसमा हे महागडं इंजेक्शन देण्यात आलं होतं.
advertisement
2/7
आज चार वर्षांनंतर तीरा आता स्वतःहून श्वास घेऊ शकते, बसू शकते आणि हिंदी, इंग्रजी, मराठी, कोकणी या चार भाषांमध्ये बोलूही लागली आहे. तिच्या या प्रगतीमुळे तिच्या कुटुंबासाठी हा आनंदाचा क्षण आहे.
advertisement
3/7
तीरावर उपचार करणाऱ्या पीडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट डॉ. नीलू देसाई यांनी सांगितले की, “तीराच्या प्रकृतीत मोठा सुधार झाला आहे. तीन वर्षांची असताना ती सपोर्टशिवाय श्वास घेऊ लागली होती.”
advertisement
4/7
आता ती स्वतः उठू-बसू शकते आणि बोलूही लागली आहे. डॉक्टरांच्या मते, केवळ औषधोपचारच नाही, तर तिच्या पालकांनी घेतलेल्या विशेष काळजीमुळेही हा बदल घडला आहे.
advertisement
5/7
तीरा अवघ्या 6 महिन्यांची असताना SMA Type-1 या आजाराचे निदान झालं होतं. या आजारावर केवळ ‘Zolgensma’ हे इंजेक्शन प्रभावी असून, ते अमेरिकेतून आयात कराव लागतं. त्याची किंमत 16 कोटी रुपये असून, भारतात आयात शुल्क आणि कर मिळून हा खर्च 22 कोटी रुपयांपर्यंत जातो.
advertisement
6/7
तीराच्या पालकांनी क्राऊडफंडिंगच्या माध्यमातून पैसे गोळा केले आणि केंद्र सरकारने सहानुभूती दाखवत 6 कोटी रुपयांचे आयात शुल्क आणि कर माफ केले. अखेर, 27 फेब्रुवारी 2021 रोजी हिंदुजा हॉस्पिटल, मुंबई येथे तीरा कामतला हे इंजेक्शन देण्यात आले.
advertisement
7/7
गेल्या चार वर्षांत तीरा हळूहळू बरी होत गेली. आज ती हसते, बोलते आणि तिचे जीवन पूर्ववत होत आहे. एका महागड्या इंजेक्शनने आणि तिच्या पालकांच्या मेहनतीमुळे संपूर्ण आयुष्य बदलू लागलं आहे. तिच्या कुटुंबीयांसाठी हे काही चमत्कारापेक्षा कमी नाही! (फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम @teera_fights_sma )
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Teera Kamat: अनुवंशिक आजार अन् 16,00,00,000 रुपयांचं एक इंजेक्शन, आता कशीये चिमुकल्या तीराची तब्येत?