उन्हाळ्यात मुलं तासनतास मोबाईल पाहतायेत? वेळीच सावध व्हा, नाहीतर तुमचं काही खरं नाही!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Summer Health: उन्हाळ्याच्या सुट्टीत अनेकांचा मोबाईलचा वापर वाढतो. स्क्रीन टाईम वाढल्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो.
advertisement
1/7

उन्हाळ्यात लहानांपासून मोठ्यांपर्यंत बहुतांश लोकांचा स्क्रीन टाईम वाढतो. सुट्ट्या, घरात राहण्याचा वाढलेला वेळ, तसेच करमणुकीसाठी मोबाईल, टॅब्लेट आणि लॅपटॉपचा वाढता वापर ही त्याची कारणे आहेत. यामुळे डोळ्यांच्या आणि मानसिक आरोग्यावर देखील मोठा परिणाम होतो.
advertisement
2/7
सतत स्क्रीनकडे पाहिल्याने डोळ्यांचे आरोग्य बिघडू शकते, झोपेवर परिणाम होऊ शकतो आणि तणावही वाढू शकतो. त्यामुळे उन्हाळ्यात स्क्रीन टाइम नियंत्रित करणे आवश्यक आहे. त्यासाठी कोणते उपाय करावे, याबद्दल पुण्यातील स्त्रीरोग आणि बालरोग तज्ज्ञ डॉ. सचिन पवार यांनी सांगितले.
advertisement
3/7
अनेक अभ्यासातून हे सिद्ध झालं आहे की मोबाईलच्या अतिवापरामुळे लहान मुलामध्ये नैराश्य चिंता आणि आत्मसन्मानाची कमी या सारख्या समस्या जाणवतात. तसेच एकटेपणाची जाणीव निर्माण होते, झोप मोड होते, मानसिक चिंता, नैराश्य अशी लक्षणे देखील आढळून येतात.
advertisement
4/7
मोबाईल सतत पहिल्यामुळे स्क्रीन टाईममध्ये वाढ होते. यामुळे डोळ्यांना ताण येणे, डोकेदुखी होणे अशा शारीरिक समस्या निर्माण होतात. मोबाईलमधील गेम, सोशल मीडियाचा वापर देखील वाढतो आहे. त्यामुळे लाईक, कमेंट आणि फॉलोअर्स याबाबत इतरांशी तुलना होते. त्यामुळे मानसिक खच्चीकरण होते.
advertisement
5/7
लहान मुलांना इलेक्ट्रिनिक गॅजेट्स आणि सोशल मीडियाच्या वापरापासून जास्तीत जास्त लांब ठेवणं गरजेचं आहे. आज आपण सोशल मीडियामुळे अनेक मुलांनी आत्महत्या केल्याची उदाहरणे पाहात आहोत. यासाठी मुलांना बाहेर फिरायला घेऊन जाणे, अभ्यास करून घेणे, इतर खेळ घेणे, तसेच त्यांचं मानसिक आरोग्य कसं आहे? याची तपासणी जवळच्या तज्ञ डॉक्टराकडून करून घेणे गरजेचे आहे.
advertisement
6/7
शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थांना मोबाईलचा वापर होणार नाही या प्रकारच मार्गदर्शन करावं. मोबाईलचा वापर होणार नाही या प्रकारे त्यांच्याशी जास्तीत जास्त संवाद साधून खेळ घ्यावेत.
advertisement
7/7
पालकांनी देखील मुलांना फिरायला घेऊन जावे. त्यांना मोबाईल ऐवजी शारीरिक खेळ खेळण्यास प्रोत्साहन द्यावे. तसेच छंद आणि आवड जोपासण्यास मदत करावी, असे डॉ. सचिन पवार सांगतात.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात मुलं तासनतास मोबाईल पाहतायेत? वेळीच सावध व्हा, नाहीतर तुमचं काही खरं नाही!