Holi 2024: बिनधास्त खेळा रंग, त्वचा आणि केस होणार नाहीत खराब! वापरा ही ट्रिक
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
होळीनंतर 25 मार्चला सर्वजण मोठ्या उत्साहात धूलिवंदन खेळतील. वर्षभराचे सर्व मतभेद, वाद विसरून एकमेकांना रंग लावतील. त्यामुळे या रंगांच्या सणाला कुठेही गालबोट लागू नये, याची काळजी घेणं आवश्यक आहे. आपल्यासह इतरांचं रंगांमुळे नुकसान होऊ नये, याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे.
advertisement
1/5

रंग स्किन आणि डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे केमिकलयुक्त रंग वापरू नका. हर्बल रंगांची धूळवड खेळा.
advertisement
2/5
स्किन स्पेशलिस्ट डॉ. विवेक सांगतात की, केमिकलयुक्त रंगांमुळे स्किनवर लाल डाग पडतात. त्याजागी खाजही येते.
advertisement
3/5
असं झाल्यास तो भाग ताबडतोब पाण्याने धुवा. जर खाज थांबतच नसेल, तर त्वरित डॉक्टरांकडे जा, घरात अजिबात ते बरं होण्याची वाट पाहत बसू नका.
advertisement
4/5
धूलिवंदन खेळण्यासाठी घराबाहेर पडताना सर्वात आधी पूर्ण स्किन आणि केसांना तेल लावून घ्या. त्यामुळे रंगांची रिऍक्शन होण्याचा धोका कमी असतो. शिवाय नंतर रंग सहजपणे निघतात.
advertisement
5/5
विशेष म्हणजे रंगपंचमी खेळल्यानंतर साबण लावून स्वच्छ आंघोळ करावी. रंग काढण्यासाठी इतर कसलाही वापर करू नये.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Holi 2024: बिनधास्त खेळा रंग, त्वचा आणि केस होणार नाहीत खराब! वापरा ही ट्रिक