जेवणात तोंडी लावायला 'ही' स्पेशल चटणी बनवा, 2 घास जरा जास्त जातील!
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
आपल्या किचनमधले सर्वच मसाले आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असतात. ते केवळ जेवणाची चव वाढवत नाहीत, तर आरोग्य सुदृढ ठेवण्याचंही काम करतात. जेवणात आपण तोंडी लावण्यासाठी विविध चटण्या बनवतो. नेमकी कोणती चटणी आरोग्यपयोगी असते हे आज आपण जाणून घेणार आहोत. (विशाल भटनागर, प्रतिनिधी)
advertisement
1/6

कोणताही पदार्थ कोथिंबीरीने सजवला की त्याची चव वाढते. याच कोथिंबीरच्या चटणीचा रोजच्या आहारात समावेश केल्यास विविध आजारांपासून आपलं रक्षण होऊ शकतं. आयुर्वेदिक एक्स्पर्ट विजय मलिक सांगतात की, कोथिंबीरीत भरपूर कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स असतात. ज्यामुळे पचनक्रिया भक्कम होते. शिवाय हृदयासाठीही कोथिंबीर उत्तम मानली जाते. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा कमालीची वाढते.
advertisement
2/6
तुळस प्रजातीतील मरवाच्या रोपाला आयुर्वेदात प्रचंड महत्त्व आहे. मरवाची केवळ स्वादिष्ट चटणी बनवली जात नाही, तर तिचा वापर चहामध्येसुद्धा केला जातो. ज्यामुळे साथीच्या रोगांशी लढण्याची ताकद मिळते. शिवाय तोंडाचा वास आणि दातांचे आजारही दूर होतात.
advertisement
3/6
आयुर्वेदात पुदिन्यालाही विशेष महत्त्व आहे. यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्ससह विविध पौष्टिक गुणधर्म असतात. ज्यामुळे आरोग्य उत्तम राहतं. रोजच्या आहारात या चटणीचा समावेश केल्यास उलटी, मळमळ हा त्रास होत नाही.
advertisement
4/6
कच्च्या कैरीची चटणी बनवून खाल्ल्यास डोळ्यांची दृष्टी तीक्ष्ण होण्यास मदत मिळते, कारण यात विविध व्हिटॅमिन्स, झिंक, अँटीऑक्सिडंटसह अनेक औषधी गुणधर्म असतात. ज्यामुळे हाडंसुद्धा भक्कम होतात.
advertisement
5/6
रोजच्या जेवणात आपण ज्याचा समावेश करतो तो टोमॅटो आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतो. टोमॅटोची चटणी बनवून खाल्ल्यास आरोग्याला त्याचा जास्त फायदा मिळू शकतो. कारण यात भरपूर व्हिटॅमिन्स असतात ज्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होतं. शिवाय अन्नपचन सुरळीत होऊन विविध आजारांशी लढण्याची ताकद शरिराला मिळते.
advertisement
6/6
सूचना : इथं दिलेली माहिती <a href="https://news18marathi.com/lifestyle/health/home-remedies-for-throat-infection-by-dr-prabhat-kumar-mhij-1195307.html">तज्ज्ञांशी</a> केलेल्या चर्चेवर आधारित आहे, तरी आपण आपल्या <a href="https://news18marathi.com/lifestyle/food/can-tomatoes-help-reduce-weight-mhij-1195902.html">आहाराबाबत</a> कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः <a href="https://news18marathi.com/photogallery/lifestyle/health/instant-home-remedy-for-gas-problems-l18w-mhij-1195851.html">डॉक्टरांचा सल्ला</a> घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
जेवणात तोंडी लावायला 'ही' स्पेशल चटणी बनवा, 2 घास जरा जास्त जातील!