Health Tips: दिवसातून किती कप चहा पितात? तुम्हाला माहितीये का एका कपाचा शरिरावर होता असा परिणाम
- Published by:Mohan Najan
- local18
Last Updated:
जास्त चहा पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं. जास्त चहा पिणाऱ्यानी काही बाबी लक्षात घेऊनच चहाचे सेवन करायला पाहिजे. चहामुळे पित्ताचा त्रास जास्त होतो.
advertisement
1/7

अनेकांच्या दिवसाची सुरुवात ही चहा पिल्याशिवाय होत नाही. चहा घेतल्यानंतरच शरीराला ताकद मिळते असंही अनेकजण म्हणतात. पण, जास्त चहा पिणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं.
advertisement
2/7
जास्त चहा पिणाऱ्यांनी काही बाबी लक्षात घेऊनच चहाचे सेवन करायला पाहिजे. चहामुळे पित्ताचा त्रास जास्त होतो. तसेच विविध समस्या देखील उद्भवू शकतात. चहा पिताना कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.
advertisement
3/7
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार चहा पिणाऱ्या व्यक्तीने सर्वात आधी लक्षात घ्यावयाची बाब म्हणजे चहा पिल्यानंतर आपल्या जिभेवर पांढरा थर जमा होतो का? हे बघणे. त्याचबरोबर चहा पिल्यानंतर आपले तोंड स्वच्छ राहते का? हे सुद्धा बघणे गरजेचे आहे.
advertisement
4/7
चहा पिल्यानंतर जर जिभेवर पांढरा थर जमा होत असेल, तोंडात पांढरी परत होत असेल तर चहा तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो. कारण अशी लक्षणं आढळून आल्यास तुमचे मेटाबोलिजम देखील स्लो असू शकते. मेटाबोलिजम स्लो असल्यास जर चहा पिण्यात आला तर पोट डिस्टर्ब होतं. त्यामुळं क्रोंस डीसिज यासारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
advertisement
5/7
काही लोकं म्हणतात, आम्ही काळा चहा, गुळाचा चहा घेतोय. पण जर जिभेवर पांढरा थर जमा होत असेल तर कोणत्याही चहामुळं तुम्हाला अपाय होऊ शकतो. साखर आणि गूळ काही वेगळं नाही. दोन्ही ऊसापासूनच बनवलेले असतात.
advertisement
6/7
त्यामुळं शक्यतो चहा टाळावा. ज्यांना चहा लागतोच. चहा शिवाय होत नाही. त्यांनी चहा थोडा वेगळ्या पद्धतीने बनवून घ्यावा. त्यासाठी चहा आणि दूध आधी उकळून घ्यायचं. त्यानंतर त्यात फक्त चहापत्ती टाकून घ्यायची आणि चहा छान उकळून घ्यायचा.
advertisement
7/7
तुम्हाला लागत असल्यास वेलची टाकून घेऊ शकता. नंतर गॅस बंद करून चहा गाळून घ्यायचा आहे. गाळून घेतल्यानंतर तुम्हाला लागत असल्यास थोडा गूळ तुम्ही त्यात घेऊ शकता. अशा चहा पिल्याने पित्ताचा त्रास होत नाही. दूध आणि पाणी एकत्र उकळल्याने ऍसिड सोलूबल आणि वॉटर सोलूबल दोन्ही चहा मध्ये येत असल्याने पित्ताचा त्रास होत नाही, अशी माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: दिवसातून किती कप चहा पितात? तुम्हाला माहितीये का एका कपाचा शरिरावर होता असा परिणाम