Fake Sweet Potato : तुम्ही भेसळयुक्त रताळे तर खात नाही ना? खरेदीपूर्वी कसं ओळखायचं पाहा, टळेल नुकसान!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Fake sweet potato identification : तुम्हालाही रताळे खायला आवडत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आजकाल बाजारात इतर खाद्यपदार्थांप्रमाणेच रताळ्यांचीही भेसळ होत असल्याचे समोर येत आहे. काही ठिकाणी रताळ्यांना कृत्रिम रंग लावून ते अधिक चमकदार आणि आकर्षक दाखवले जात आहेत, जेणेकरून ग्राहक सहज फसतील.
advertisement
1/7

रंग लावलेली रताळी दिसायला जरी सुंदर वाटत असली, तरी ती आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. या रताळ्यांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित त्रास, अपचन आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, एक सोपा उपाय वापरून तुम्ही घरीच खरी आणि नकली रताळी ओळखू शकता.
advertisement
2/7
नकली रताळे खाल्ल्याने काय नुकसान होऊ शकते? : काही व्यापारी रताळे अधिक लालसर आणि चकचकीत दिसावीत यासाठी त्यावर Rhodamine B सारखा केमिकल रंग लावतात. हा रंग खाण्यासाठी अजिबात सुरक्षित नाही. दीर्घकाळ असे रताळे खाल्ल्यास आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
advertisement
3/7
घरीच कशी कराल रताळ्यांची चाचणी? : तुम्ही बाजारातून आणलेली रताळी खरी आहेत की त्यावर रंग लावलेला आहे, हे तपासण्यासाठी कोणत्याही महागड्या वस्तूंची गरज नाही. ही चाचणी तुम्ही अगदी सहज घरी करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक कापसाचा बोळा आणि थोडे पाणी किंवा खाण्याचे तेल लागेल.
advertisement
4/7
चाचणी करण्याची पद्धत : कापसाचा बोळा घ्या आणि तो पाणी किंवा खाण्याच्या तेलात भिजवा. लक्षात ठेवा, कापूस फार जास्त ओलसर नसावा. आता हा कापूस रताळ्याच्या सालीवर हलक्या हाताने चोळा.
advertisement
5/7
जर कापसाचा रंग बदलला नाही, तर समजा रताळे खाण्यास सुरक्षित आहेत आणि त्यावर कोणताही केमिकल रंग लावलेला नाही. पण जर कापूस लाल किंवा गुलाबी रंगाचा झाला, तर त्या रताळ्यांवर रंग लावलेला आहे आणि ते खाणे टाळावे.
advertisement
6/7
हा छोटासा उपाय वापरून तुम्ही सहजपणे खरे, शुद्ध आणि नकली किंवा भेसळयुक्त रताळी ओळखू शकता. त्यामुळे बाजारातून खरेदी करताना सावध रहा आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्या.
advertisement
7/7
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Fake Sweet Potato : तुम्ही भेसळयुक्त रताळे तर खात नाही ना? खरेदीपूर्वी कसं ओळखायचं पाहा, टळेल नुकसान!