TRENDING:

पाचव्या महिन्यातच मिसकॅरेज, बाळ गमावल्यानंतर अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था; जिद्दीने केली फिल्म, जिंकला नॅशनल अवॉर्ड

Last Updated:
२०२० चा तो काळ अभिनेत्रीसाठी अत्यंत कठीण होता. तिने नुकतंच तिचं दुसरं बाळ गमावलं होतं. ती या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्याकडे एका फिल्मची ऑफर आली.
advertisement
1/7
पाचव्या महिन्यातच मिसकॅरेज, बाळ गमावल्यानंतर अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था
आज चित्रपटगृहांमध्ये राणी मुखर्जीच्या 'मर्दानी ३' चा डंका वाजतोय. राणीने सिनेसृष्टीत पाऊल ठेवून ३० वर्ष पूर्ण झाल्याचा हा खास क्षण आहे. पण या आनंदाच्या वातावरणात राणीने तिच्या आयुष्यातील एका अत्यंत खासगी आणि वेदनादायी जखमेवरची खपली काढली आहे.
advertisement
2/7
'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटासाठी नुकताच राणीला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, पण या चित्रपटामागची खरी प्रेरणा ही एका आईचं दुःख होतं, हे आता समोर आलं आहे.
advertisement
3/7
२०२० चा तो काळ राणीसाठी अत्यंत कठीण होता. राणीने नुकतंच तिचं दुसरं बाळ गमावलं होतं. त्या काळात ती या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच तिच्याकडे 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे'ची कथा आली.
advertisement
4/7
एका मुलाखतीत राणी म्हणाली, "ती कथा माझ्याकडे अशा वळणावर आली जेव्हा मी माझ्या आयुष्यात बाळ गमावल्याचे दुःख अनुभवत होते. त्या कथेने माझं मन इतकं हेलावलं की मला वाटलं, ही कथा जगाला सांगणं माझं कर्तव्य आहे."
advertisement
5/7
आपल्या मुलांपासून दुरावलेल्या आईची तगमग राणीने पडद्यावर जिवंत केली. त्यामागचं कारण सांगताना ती म्हणाली, "भारतात आपल्याकडे परदेशात स्थायिक होण्याचं एक वेगळंच वेड आहे. पण तिथलं वास्तव खूप वेगळं असू शकतं. स्वतःच्या डोळ्यादेखत जर तुमचं बाळ कोणी हिरावून घेत असेल, तर त्या आई आणि त्या मुलांना काय भोगावं लागतं, हे मला भारताला दाखवायचे होते." नॉर्वेमधील फोस्टर केअर सिस्टिम विरुद्ध एका भारतीय आईने दिलेला हा लढा खऱ्या अर्थाने राणीच्या मनात घर करून गेला होता.
advertisement
6/7
आज ३० जानेवारीला राणीचा 'मर्दानी ३' प्रदर्शित झाला आहे. २०१४ मध्ये २१ कोटींच्या बजेटमध्ये सुरू झालेला 'शिवानी शिवाजी रॉय'चा हा प्रवास आज एका मोठ्या उंचीवर पोहोचला आहे. पहिल्या भागात मानवी तस्करी, दुसऱ्या भागात नराधम 'सनी'चा खात्मा केल्यानंतर, आता तिसऱ्या भागात राणी पहिल्यांदाच एका महिला खलनायिकेचा सामना करताना दिसत आहे.
advertisement
7/7
'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' मधील राणीच्या अभिनयाला नॅशनल अवॉर्ड मिळाल्याने तिच्या ३० वर्षांच्या करिअरवर मानाचा तुरा रोवला गेला आहे. ज्या वेदनेतून तिने तो चित्रपट साकारला, त्या वेदनेची दखल देशाने घेतल्याची भावना तिच्या चाहत्यांमध्ये आहे. ३० वर्षांनंतरही राणीची पडद्यावरची जादू आजही तशीच कायम आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
पाचव्या महिन्यातच मिसकॅरेज, बाळ गमावल्यानंतर अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था; जिद्दीने केली फिल्म, जिंकला नॅशनल अवॉर्ड
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल