TRENDING:

Ginger Storing Tips : आलं साठवताना 'या' 4 चुका टाळा! 15 दिवसच काय, महिनाभर राहील फ्रेश..

Last Updated:
How to store ginger in fridge : बऱ्याचदा फ्रिजमध्ये आपण ज्या भाज्या आणि फळं साठवतो, त्या लवकर खराब होतात. आपल्याला कळत नाही की हे असं का होतं. बऱ्याचदा याचं कारण साठवताना झालेल्या काही चुका असतात. असाच आलं साठवताना आपल्याला काही चुकांमुळे ते लवकर खराब होतं. चला फुलाय ते कसं साठवावं.
advertisement
1/5
Ginger Storing Tips : आलं साठवताना 'या' 4 चुका टाळा! 15 दिवसच काय, महिनाभर राहील फ्रेश..
आलं तसं तर आठवडाभर टिकतंच. आलं खरेदी करताना ते कोरडं असल्यास ते जास्त काळ टिकतं. मात्र आलं फ्रिजमध्ये ठेवण्याआधी आपण त्याला कसं हाताळतो ते महत्त्वाचं असतं. चला पाहूया, आलं साठवण्याची योग्य पद्धत.
advertisement
2/5
सर्वात आधी तर आलं घरी आणल्यानंतर आपण ते धुवू नये. काही लोक इतर भाज्यांप्रमाणे आलंही धुवून फ्रिजमध्ये ठेवतात. पण असं करू नये. कोरडं आलं जास्त काळ टिकतं, तर पाण्यामुळे आल्यात ओलावा वाढतो आणि त्याला बुरशी लागू शकते.
advertisement
3/5
आलं साठवताना ते एखाद्या डब्यात साठवा आणि त्यामध्ये टिश्यू पेपर किंवा पेपर टॉवेल नक्की टाका. कारण टिश्यू पेपर आल्यातील ओलावा शोषतो आणि आलं चिकट किंवा काळे पडत नाही.
advertisement
4/5
आलं नेहमी एअर टाईट कंटेनरमध्ये साठवावं. कारण ते उघडं ठेवल्यास लवकर खराब खराब होऊ शकतं. तुम्ही आलं एखाद्या झिप-लॉक बॅगमध्येदेखील ठेऊ शकता. यामुळे ताजंही राहीलच आणि फ्रिजमधील इतर वस्तूंचा वास त्याला लागणार नाही.
advertisement
5/5
ही स्टेप देखील खूप महत्त्वाची आहे. आलं कधीही फ्रिजच्या डोअरमध्ये ठेऊ नये. कारण त्यामुळे ते लवकर खरं होऊ शकतं. याऐवजी आलं क्रिस्पर किंवा भाजीच्या ड्रॉवरमध्ये ठेवा. इथे योग्य तापमान मिळतं, ज्यामुळे आलं अधिक काळ फ्रेश राहू शकतं. (Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Ginger Storing Tips : आलं साठवताना 'या' 4 चुका टाळा! 15 दिवसच काय, महिनाभर राहील फ्रेश..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल