TRENDING:

नेलपेंट्स सुकल्यावर फेकून देता? थांबा 'या' टिप्स वापरून त्याचा पुनर्वापर करा

Last Updated:
नेलपेंट्स सुकले की ते नखांवर नीट लावता येत नाही. त्यामुळे महिलांसमोर नेलपेंटची बॉटल फेकून देण्यावाचून काही पर्याय नसतो. परंतु अनेकदा महागडी नेलपेंट सुकल्यावर ती अशाप्रकारे फेकून देणे जीवावर येते तसेच अनेकदा नेलपेंटचा रंग आवडीचा असल्याने ते फेकून द्यावे असे वाटत नाही. तेव्हा सुकलेल्या नेलपेंट्स फेकून देण्याऐवजी तुम्ही काही टिप्स वापरून त्याचा पुनर्वापर करू शकता.
advertisement
1/5
नेलपेंट्स सुकल्यावर फेकून देता? थांबा 'या' टिप्स वापरून त्याचा पुनर्वापर करा
नेल पॉलिश थिनर : सुकलेल्या नेलपेंट्समध्ये तुम्ही नेल पॉलिश थिनर टाकून ती पुन्हा नव्या सारखी करू शकता. यासाठी तुम्ही सुकलेल्या नेलपेंट बॉटलमध्ये 2 ते 3 थेंब थिनर टाका आणि झाकण बंद करून बॉटल 2 मिनिटे हलवून घ्या. असे केल्याने सुकलेली नेलपेंट पातळ होते.
advertisement
2/5
बॉटलमधील नेलपॉलिश सुकलं असेल तर ते 15 मिनिटांसाठी उन्हात ठेवा. मग बॉटल काही वेळ हलवा. नेलपॉलिशची बॉटल उन्हात ठेवल्याने त्यातील सुकलेले नेलपेंट वितळते आणि ते पुन्हा नखांना लावण्यायोग्य होऊ शकते.
advertisement
3/5
सुकलेल्या नेलपेंटच्या बॉटलमध्ये तुम्ही टांसपरेंट नेलपेंटचे काही थेंब घातल्यास नेलपेंटचा रंग अधिक चांगला होतो आणि ती नेलपेंट नखांवर लावण्यायोग्य होते.
advertisement
4/5
सुकलेली नेलपेंट वितळवण्यासाठी नेलपॉलिशची बॉटल गरम पाणी असलेल्या भांड्यात ठेवा. जवळपास 20 मिनिटे ती बॉटल पाण्यात तशीच राहू द्या. असे केल्याने बॉटलमधील सुकलेले नेलपेंट वितळते.
advertisement
5/5
नेलपॉलिश कधीही फ्रिजमध्ये ठेवू नका. तसेच नेलपेंट नखांवर लावण्यासाठी काढल्यास पंखा लावू नका कारण नेलपेंटच्या उघड्या बॉटलला हवा लागल्यास आतील द्रव पूर्णपणे सुकून जाते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
नेलपेंट्स सुकल्यावर फेकून देता? थांबा 'या' टिप्स वापरून त्याचा पुनर्वापर करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल