Bandra Tourism : ना शॉपिंग, ना स्ट्रीट फूड! वांद्रयात सर्वात जास्त 'या' गोष्टीचे आहे पर्यटकांना वेड
Last Updated:
Bandra Most Famous For This : वांद्रे हे ठिकाण महिलावर्गाच्या जास्त आवडीचे ठिकाण आहे कारण या शहरात अनेक शॉपिंग मार्केट आहेत शिवाय अनेक स्ट्रीट फूडसाठी प्रसिद्ध ठिकाण आहेत. मात्र हे सर्व सोडून वांद्रेमध्ये अजून काही आहे ते तुम्हाला माहिती आहे का?चला तर मग एकदा जाणून घेऊयात.
advertisement
1/6

वांद्रेची सफर- मुंबई हे शहर अत्यंत विस्तृत असे आहे. जिथे येणार प्रत्येकजण या शहराचे सौदर्यं पाहून हरखून जातो. पण या विस्तृत महानगरातील एक महत्त्वाचे शहर कायम पर्यटकांचे हॉटस्पॉट ठरते ते म्हणजे वांद्रे.
advertisement
2/6
सेलिब्रिटींची दुनिया - वांद्रे हे शहर सामान्य व्यक्तींपासून ते प्रत्येक पर्यटकांसाठी खास ठिकाण आहे. येथे तुम्हाला रस्त्यांवर फिरताना अनेक सेलिब्रिटींची घरं, कॅफे आणि शूटिंगची प्रसिद्ध ठिकाणे पाहायला मिळतात. त्यात हे ग्लॅमर आणि समुद्रकिनाऱ्याचा नजारा यामुळे वांद्रे हे शहर नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत असतं.
advertisement
3/6
माउंट मेरी चर्च- वांद्रात तुम्ही आलात तर माउंट मेरी चर्च पाहण्यासाठी नक्की जावा. खास करुन डिसेंबर महिन्यात अर्थात नाताळच्या वेळी या ठिकाणी मोठी जत्रा भरते. हे अतिशय सुंदर आणि तितकेच शांत ठिकाण आहे.
advertisement
4/6
व्यवसायाच्या संधी - वांद्रे हे शहर व्यवसायाच्या दृष्टीनेही अतिशय असे महत्त्वाचे शहर आहे. जिथे तुम्हाला बीकेसी या परिसरात अनेक मोठ्या कंपन्या दिसतील, ज्या कायमच व्यावसायिक लोकांचे आकर्षणाचे ठिकाण ठरतात. या ठिकाणी महत्त्वाच्या बँका ही आहेत अर्थात वांद्रेच्या बीकेसीला व्यापारी जिल्हा म्हणून ही ओळखले जाते.
advertisement
5/6
समुद्र किनारा - वांद्रेमध्ये तुम्ही आलात तर तुम्ही शॉपिंग किंवा स्ट्रीट फूड सोडून तिथे असलेले कार्टर रोड आणि बँडस्टँड येथे असलेले समुद्र किनारे नक्कीच पाहण्यासाठी जावा. या ठिकाणी अनेक पर्यटक किंवा स्थानिक नागरिक संध्याकाळी सुर्यास्त पाहण्यासाठी येत असतात. महत्त्वाचे म्हणजे हे दृश्य अतिशय सुंदर असे दिसते.
advertisement
6/6
वांद्रेला कसं पोहचाल- वांद्रे हे पश्चिम रेल्वे वेस्टर्न लाईनवरील एक प्रमुख स्थानक आहे. सेंट्रल लाईनवरुन येणाऱ्याना आधी दादर स्टेशनवर उतरावे लागेल आणि नंतर वेस्टर्न लाईनवरुन वांद्रे स्टेशनकडे जाणारी ट्रेन पकडावी लागेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Bandra Tourism : ना शॉपिंग, ना स्ट्रीट फूड! वांद्रयात सर्वात जास्त 'या' गोष्टीचे आहे पर्यटकांना वेड