TRENDING:

Password Psychology : Ex चं नाव पासवर्ड म्हणून का सेव्ह करतात लोक? तज्ज्ञांनी सांगितले अचूक कारण..

Last Updated:
Why most people set their password on Ex's name : आजच्या डिजिटल युगात पासवर्ड हा केवळ तांत्रिक सुरक्षा उपाय नसून तो आपल्या मनोविश्वाशीही जोडलेला असतो. अनेकदा लोक आपला मोबाईल, सोशल मीडिया किंवा ई-मेलचा पासवर्ड एक्सच्या नावावर ठेवतात. सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने असा पासवर्ड अतिशय कमकुवत मानला जातो, पण मानसशास्त्राच्यामते, यामागे काही कमत्त्वाची कारणं असतात.
advertisement
1/9
Ex चं नाव पासवर्ड म्हणून का सेव्ह करतात लोक? तज्ज्ञांनी सांगितले अचूक कारण..
तज्ज्ञांच्या मते, आपला पासवर्ड आपल्या स्मृती, भावनिक जडणघडण आणि अपूर्ण राहिलेल्या भावनाबद्दल सांगतो. कदाचित तुमच्याही ओळखीतील कुणी तरी एक्सच्या नावाचा पासवर्ड ठेवलेला असेल, किंवा तुम्ही स्वतःही कधीतरी असं केलं असेल. प्रश्न असा पडतो की, ब्रेकअप झाल्यानंतरही एखाद्याचं नाव इतकं खोल मनात का राहतं? यामागे काही ठराविक मानसशास्त्रीय कारणं आहेत, जी समजून घेणं महत्त्वाचं आहे.
advertisement
2/9
Aajtak Podcast नुसार, पासवर्ड हा फक्त कोड नसून तो एक प्रकारचा 'इमोशनल अँकर' असतो. एखादी व्यक्ती जेव्हा आपल्या आयुष्यात खूप जवळची असते, तेव्हा तिचं नाव मेंदूत खोलवर रुजतं. नातं संपल्यानंतरही ते नाव पटकन आठवतं आणि त्यामुळेच अनेकजण तेच नाव पासवर्ड म्हणून वापरतात.
advertisement
3/9
मानसशास्त्रज्ञांच्या मते, एक्सच्या नावावर पासवर्ड ठेवण्यामागे मुख्यतः तीन कारणं असतात. इमोशनल मेमरी, नॉस्टॅल्जिया आणि अपूर्ण अटॅचमेंट किंवा कंट्रोलची भावना. पासवर्ड बनवताना मेंदू अनेकदा लॉजिकपेक्षा भावना जास्त वापरतो. त्यामुळे जुनी नाती, आठवणी आणि नावं सहजपणे पासवर्डमध्ये येतात.
advertisement
4/9
Cosmopolitan.in च्या मते, लोक सहसा तोच पासवर्ड ठेवतात, जो त्यांच्या डोक्यात आपोआप येतो. एखादं नाव, जुना क्रश किंवा खास आठवण ही दीर्घकाळच्या नात्यामुळे ‘मसल मेमरी’ सारखी मेंदूत साठलेली असते. त्यामुळे ब्रेकअप झाल्यानंतरही एक्सचं नाव सहज विसरलं जात नाही.
advertisement
5/9
Attachmentproject.com नुसार, आपले एक्स हे अनेकदा 'अटॅचमेंट फिगर' असतात. नातं तुटल्यानंतर मेंदूला त्या व्यक्तीशी जोडलेली चिन्हं, नाव, तारखा, जागा सोडायला वेळ लागतो. त्यामुळे अशा गोष्टी नकळत आपल्या दैनंदिन सवयींमध्ये अगदी पासवर्डमध्येही दिसून येतात.
advertisement
6/9
Marriage.com च्या अहवालानुसार, जे लोक ब्रेकअपनंतर सतत एक्सबद्दल विचार करत राहतात, ते अनेकदा नकळत त्याच नावाचा पासवर्ड ठेवतात. हा एक प्रकारे त्या व्यक्तीशी जोडलेलं राहण्याचा, आठवणी जपण्याचा प्रयत्न असू शकतो.
advertisement
7/9
Talktoangel.com च्या मते, काही वेळा एक्सच्या नावाचा पासवर्ड ठेवणं म्हणजे एक गुप्त भावनिक नातं टिकवून ठेवणं असतं. जणू स्वतःलाच सांगणं की हा अध्याय अजून पूर्णपणे संपलेला नाही. काही प्रकरणांमध्ये ही गोष्ट ‘कंट्रोल’ किंवा ‘पॅसिव्ह-अ‍ॅग्रेसिव्ह’ भावनांशीही जोडलेली असू शकते.
advertisement
8/9
थोडक्यात सांगायचं झालं तर, एक्सच्या नावावर पासवर्ड ठेवणं ही केवळ सवय नाही, तर ती आपल्या भावनिक अवस्थेचं प्रतिबिंब आहे. मात्र सायबर सिक्युरिटीच्या दृष्टीने असे पासवर्ड धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे जुन्या आठवणी जपताना डिजिटल सुरक्षिततेकडेही लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे.
advertisement
9/9
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Password Psychology : Ex चं नाव पासवर्ड म्हणून का सेव्ह करतात लोक? तज्ज्ञांनी सांगितले अचूक कारण..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल