TRENDING:

Numerology: एक टोक हे तर एक टोक ते..! इतका अचानक बदल होणारे लोक या 3 जन्मतारखांचे असतात

Last Updated:
Numerology: आपणास आजूबाजूला अनेकदा असे लोक भेटत असतील जे तुम्हाला मूडी वाटतात. परिस्थिती कशीही असो, पण ही माणसं नेहमी आपल्या मनासारखं वागतात. याच स्वभावामुळे असे लोक कधी खूप आनंदी दिसतात, तर दुसऱ्याच क्षणी एकदम शांत आणि गंभीर होतात. अंकशास्त्रामध्ये अशा लोकांबद्दल विशेष माहिती दिली आहे.
advertisement
1/5
एक टोक हे तर एक टोक ते..! इतका अचानक बदल होणारे लोक या 3 जन्मतारखांचे असतात
अंक ज्योतिष ही एक प्राचीन विद्या असून ज्याच्या माध्यमातून तुम्ही समोरच्या व्यक्तीचे भविष्य आणि व्यक्तिमत्व सहजपणे जाणून घेऊ शकता. ही विद्या भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरा आणि विज्ञानावर आधारित आहे. जन्मतारखेच्या माध्यमातून जाणून घेऊया, कोणत्या मूलांकाचे लोक मूडी असतात.
advertisement
2/5
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14 किंवा 23 तारखेला होतो, त्यांचा मूलांक 5 असतो. हे लोक खरोखरच मूडी प्रकारचे असतात. यांचा स्वभाव इतका बदलत राहतो की त्यांना समजून घेणं सोपं नसतं. कधी कधी वाटतं की सगळं काही ठीक आहे, पण पुढच्याच क्षणी हे लोक पूर्णपणे वेगळ्या मूडमध्ये दिसतात.
advertisement
3/5
मूलांक 5 च्या लोकांवर बुध ग्रहाचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो, ज्यामुळे हे लोक बुद्धिमान आणि तल्लख मेंदूचे असतात. निर्णय पटापट घेतातच, शिवाय नवीन गोष्टी शिकण्यात आणि शोधण्यातही नेहमी पुढे असतात. यांच्याकडे उर्जा भरपूर असते. मेहनत, धाडस आणि जिज्ञासा हे त्यांच्या जीवनाचा भाग असतात. याच कारणामुळे हे लोक कोणत्याही आव्हानाला न घाबरता स्वीकारतात आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधून काढतात.
advertisement
4/5
मूलांक 5 च्या लोकांचा हा मूडी स्वभाव त्यांच्या आजूबाजूच्या लोकांसाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो. मित्र आणि कुटुंबातील लोक अनेकदा त्यांचा मूड समजून घेताना गोंधळून जातात. पण जर त्यांचा स्वभाव आणि ऊर्जा समजून घेतली, तर त्यांच्यासोबत वेळ घालवणं खूप मजेशीर आणि रोमांचक असू शकतं. हे लोक खूप कष्टाळू सुद्धा असतात आणि मूलांक 5 चे लोक जास्तीत जास्त व्यवसाय क्षेत्रात दिसून येतात. या मूलांकाचे विद्यार्थी अभ्यासाच्या बाबतीत जेमतेम असतात.
advertisement
5/5
मल्टीटास्किंग असतात - मूलांक 5 चे लोक सामाजिकदृष्ट्या खूप सक्रिय असतात. नवीन मित्र बनवण्यात हे लोक माहीर असतात आणि लोकांमध्ये लवकर मिसळून जातात. हे लोक एकाच वेळी अनेक कामं करण्यात म्हणजेच मल्टीटास्किंगमध्ये पटाईत असतात आणि जीवनातील प्रत्येक अनुभवाकडे शिकण्याची संधी म्हणून पाहतात. फिरण्याची, नवीन ठिकाणांना भेटी देण्याची आणि नवीन अनुभव घेण्याची त्यांना खूप आवड असते. एकाच ठिकाणी जास्त काळ टिकून राहणं त्यांना कठीण जातं. म्हणूनच हे लोक सहलींचे आणि प्रवासाचे बेत लवकर लवकर आखत असतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/राशीभविष्य/
Numerology: एक टोक हे तर एक टोक ते..! इतका अचानक बदल होणारे लोक या 3 जन्मतारखांचे असतात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल