'मी रडले की तुम्ही मला…' 13 वर्षांच्या संसार, जेनिलियानं पहिल्यांदाच सांगितली रितेशची ती सवय
- Published by:Minal Gurav
Last Updated:
अभिनेत्री जेनिलिया देशमुखनं रितेशच्या बर्थडे दिवशी खास पोस्ट लिहिली आहे. रितेश आणि तिच्या 13 वर्षांच्या संसारातील ती गोष्ट सर्वांना सांगितली.
advertisement
1/9

संपूर्ण महाराष्ट्र ज्याला भाऊ म्हणून ओळखतो तो अभिनेता म्हणजे रितेश देशमुख. हिंदी सिनेमातून करिअरची सुरूवात केली असली तरी रितेशनं मराठीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
advertisement
2/9
रितेश म्हटलं की त्याच्याबरोबर जेनिलिया हे नावही येतंच. दोघांना पावर कपल म्हटलं जातं. दोघांचा 13 वर्षांचा सुखी संसार आहे. दोन मुलांसह दोघांचं चौकोनी कुटुंब नेहमीच सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात.
advertisement
3/9
पावर कपल कसं असावं असं विचारल्यानंतर आपसुकच रितेश आणि जेनिलिया ही जोडी समोर येते. 13 वर्षांच्या संसारानंतरही दोघे आइडियल कपल समजले जातात. त्यांच्या सुखी संसाराचं सीक्रेट काय?
advertisement
4/9
रितेशच्या बर्थडे निमित्तानं जेनिलियानं त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे. रितेशसोबत नेहमी फनी व्हिडीओ करणाऱ्या जेनिलियानं त्याच्यासाठी इमोशनल पोस्ट लिहिली आहे.
advertisement
5/9
जेनिलियानं पोस्टमध्ये लिहिलंय, "माझे सर्वात प्रिय रितेश. आम्हाला ओळखणाऱ्या प्रत्येकालाच नेहमी प्रश्न पडतो की इतकी वर्षे झाली तरी आम्ही इतके घट्ट कसे आहोत आणि तरीही एवढे आनंदी कसे राहतो?"
advertisement
6/9
"त्यामागचं खरं कारण एकच आहे, ते म्हणजे तुम्ही. तुम्ही म्हणजे प्रेम आहे. तुम्ही मला मनापासून हसवता आणि मी रडलेच तर माझे प्रत्येक अश्रू तुम्ही पुसता."
advertisement
7/9
जेनिलियानं पुढे लिहिलंय, "लोकांशी नातं जोडण्याची तुमची पद्धत खूपच खास आहे. तुमच्यासोबत असताना प्रत्येकाला असं वाटतं की तुम्ही महत्त्वाचे आहात. आणि माझ्यासाठी तर तुम्ही 24-7 सोबत आहात."
advertisement
8/9
"ज्याचं मन सोन्यासारखं शुद्ध आहे अशा माणसाकडून मला रोज काय अनुभवायला मिळत असेल याची कल्पनाच करा. मी तुम्हाला दररोज, प्रत्येक मिनिटाला, प्रत्येक क्षणाला सेलिब्रेट करत राहीन, कारण तुम्ही या सगळ्याहून जास्त आहात."
advertisement
9/9
"हॅप्पी बर्थडे माय हार्ट बीट. माझं संपूर्ण हार्ट तुमच्याकडेच आहे. फक्त ते जपून ठेवा", असं म्हणत जेनिलियानं रितेशला बर्थडे विश केलंय.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
'मी रडले की तुम्ही मला…' 13 वर्षांच्या संसार, जेनिलियानं पहिल्यांदाच सांगितली रितेशची ती सवय