Pregnancy : नियमित पीरियड्स येतात तरी प्रेग्नंट कशी होत नाही? डॉक्टरांनी सांगितला नेमका प्रॉब्लेम कुठे?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Pregnancy Problem : याबाबत तज्ज्ञ म्हणाले, नियमित मासिक पाळी म्हणजे सगळं ठिक आहे, प्रेग्नन्सीत काही समस्या येणार नाही असं नाही.
advertisement
1/7

मासिक पाळी अनियमित असली की अशा महिलांना प्रेग्नन्सीत समस्या येतात. त्यामुळे मासिक पाळी नियमित असली की बऱ्याच महिला प्रेग्नन्सीबाबत निश्चिंत असतात. मासिक पाळी नियमित येऊनही गर्भधारणा झाली नाही मग त्यांना प्रश्न पडतो, हे कसं शक्य आहे? मला पीरियड्स तर रेग्युलर येतात पण प्रेग्नन्सीत समस्या कशी काय येते आहे?
advertisement
2/7
यामागे अनेक कारणं आहेत, त्यापैकी एक म्हणजे तुम्हाला मासिक पाळी येत असेल पण अंडं म्हणजे बीज रिलीज होत नसेल. दुसरं म्हणजे बिजाची क्वालिटी चांगली नसेल.
advertisement
3/7
तिसरं म्हणजे कदाचित तुमची मासिक पाळी नियमित आहे, पण प्रेग्नन्सीत समस्या तुमच्यामुळे नाही तर तुमच्या नवऱ्यामुळे असू शकते, त्याचे स्पर्म हेल्दी नसावेत.
advertisement
4/7
चौथं म्हणजे फॅलोपिन ट्युब ब्लॉक असेल किंवा फायब्रॉइड म्हणजे गाठी, हार्मोन्स अनियंत्रित अशा समस्या असतील. तरी समस्या येईल.
advertisement
5/7
प्रजनन म्हणजे फक्त नियमित मासिक पाळी नाही तर यात लाइफस्टाईल, आहार, एकंदर संपूर्ण आरोग्याची महत्त्वाची भूमिका बजावते.
advertisement
6/7
त्यामुळे नियमित मासिक पाळी असूनही तुम्हाला काही महिने किंवा वर्षे प्रेग्नन्सी राहत नसेल तर डॉक्टरांकडे जा, नेमकं कारण समजून घ्या आणि त्यावर उपचार घ्या.
advertisement
7/7
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अखिला जोशी यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. (सर्व फोटो : प्रतीकात्मक)
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Pregnancy : नियमित पीरियड्स येतात तरी प्रेग्नंट कशी होत नाही? डॉक्टरांनी सांगितला नेमका प्रॉब्लेम कुठे?