कपड्यांवरील शाईचे डाग कसे काढावेत? 4 सोप्या टिप्स, डाग झटक्यात होतील गायब
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
अनेकदा लहान मुलं तसेच मोठ्या माणसांच्या कपड्यांवर शाईचे डाग पडतात. अशावेळी डाग पडलेला शर्ट किंवा कपडे कितीही आवडते असले तरी ते फेकून देण्यावाचून पर्याय नसतो. तेव्हा कपड्यांवर पडलेले शाईचे डाग कसे काढावेत यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स जाणून घ्या.
advertisement
1/10

मीठः कपड्यांवरचा शाईचा डाग काढायचा असेल तर डागाचा भाग ओला करून घ्या. मग त्यावर मीठ लावा. मग काही वेळाने ओल्या टिशू पेपरने घासा. असे केल्याने डाग हलका होईल.
advertisement
2/10
नेलपेन्ट रिमूव्हरः नेलपेन्ट रिमूव्हर हा शाईचे डाग काढण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यासाठी एका कॉटन बॉलवर नेलपेन्ट रिमूव्हर घेऊन तो तेहत शाईचा डाग असलेल्या ठिकाणी लावा. मग डाग काढल्यानंतर कपडे धुवून घ्या.
advertisement
3/10
कॉर्नस्टार्चः कॉर्नस्टार्च किंवा कॉर्नफ्लोरचा वापर कपड्यांवरील शाईचा डाग काढण्यासाठी केला जाऊ शकतो. थोडे दूध आणि कॉर्नस्टार्च मिक्स करून घट्ट पेस्ट बनवून घ्या. मग हे डागावर लावून घ्या. पेस्ट कोरडी झाल्यानंतर ब्रशच्या सहाय्याने डाग घासा नंतर गरम पाण्याने कपडे धुवा.
advertisement
4/10
हेअर स्प्रेः हेअर स्प्रे हा केस सेट करण्यासाठी वापरला जातो. परंतु हा हेअर स्प्रे तुम्ही शाईचा डाग काढण्यासाठी वापरू शकता. शाईच्या डागांवर थेट हेअर स्प्रे लावा. एक क्षण थांबा. कोरडे झाल्यावर पुन्हा स्प्रे करा. कोरडे झाल्यानंतर ब्रशने डाग असलेली जागा हळुवारपणे घासून घ्या.
advertisement
5/10
व्हाईट व्हिनेगरः व्हाईट व्हिनेगर हा डाग काढण्यासाठी उत्तम पर्याय आहे. 3 चमचे कॉर्नस्टार्चमध्ये 2 चमचे व्हिनेगर मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. शाई लागल्या जागेवर पेस्ट लावा. कोरडी झाल्यानंतर ब्रशने घासून घ्या आणि कपडे धुवून घ्या.
advertisement
6/10
advertisement
7/10
advertisement
8/10
advertisement
9/10
advertisement
10/10
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कपड्यांवरील शाईचे डाग कसे काढावेत? 4 सोप्या टिप्स, डाग झटक्यात होतील गायब