TRENDING:

कपड्यांवर पडलेले चहाचे डाग निघतच नाही ना? या ट्रिकने चकाचक होतील कपडे

Last Updated:
प्रत्येकजण दिवसातून एकदा तरी जहा अवश्य पित असतो. मात्र अनेकदा चहा पिताना चहाचे थेंब हे कपड्यांवर पडतात. जे स्वच्छ करणं खूप कठीण जातं.
advertisement
1/5
कपड्यांवर पडलेले चहाचे डाग निघतच नाही ना? या ट्रिकने चकाचक होतील कपडे
Tips And Tricks: चहा पिणे हे जवळपास सर्वांनाच आवडते. प्रत्येकजण दिवसातून एकदा तरी चहा पितो, मात्र चहा पिताना अनेकदा चहाचे थेंब हे कपड्यांवर पडतात. हे कपड्यांवरील डाग अजिबा, निघत नाहीत. बरेच उपाय करुनही हे चहाचे डाग निघण्याचं नाव घेत नाहीत. यासाठी आज आपण अशा काही ट्रिक पाहणार आहोत. ज्यामुळे चहाचे डाग हे झटपट निघतील आणि कपडे चकाचक होतील.
advertisement
2/5
चहामुळे होतो हा प्रॉब्लम : चहाची चव प्रत्येकाचे मन जिंकते. परंतु त्यातील काही थेंब अगदी महागड्या कपड्यांचा शो देखील खराब करू शकतात. खरंतर कपड्यांवरील चहाचे डाग काढणे खूप अवघड असते. चहामुळेही काही लोकांना त्रास होतो.
advertisement
3/5
लिंबू आहे फायदेशीर : कपड्यांवर चहा सांडला असेल तर काळजी करण्याची गरज नाही. कपड्यांवरील चहाचे डाग तुम्ही लिंबाच्या मदतीने सहज साफ करू शकता. यासाठी तुम्हाला एक लिंबू कापावे लागेल. आता हा तुकडा कपड्याच्या डागलेल्या भागावर काही वेळ घासून घ्या. यानंतर कपडे धुवावेत. चहाचा डाग क्षणार्धात निघून जाईल कारण लिंबू सर्वोत्तम ब्लीचिंग एजंट आहे.
advertisement
4/5
व्हिनेगरही आहे फायदेशीर :तुम्ही व्हिनेगर लावून कपड्यांवरील चहाचे डागही साफ करू शकता. यासाठी तुम्हाला एक बादली पाणी घ्यावे लागेल, त्यात अर्धा कप पांढरा व्हिनेगर घाला. आता या मिश्रणात कापड सुमारे 20-25 मिनिटे भिजवून ठेवा, त्यानंतर कापड धुवा. या ट्रिकने कापड पूर्णपणे स्वच्छ होईल.
advertisement
5/5
बटाटाही सर्वोत्तम उपाय : तुम्हाला लिंबू आणि व्हिनेगर वापरायचे नसेल तर तुम्ही बटाट्याच्या मदतीने कपड्यांवरील चहाचे डाग सहज साफ करू शकता. सर्व प्रथम तुम्हाला बटाटे उकडावे लागतील. उकडल्यानंतर बटाटे सोलून घ्या. आता सोललेले बटाटे कापडावर घासून घ्या आणि काही वेळाने कपडे धुवा. कपड्यांवरुन चहाचे डाग हे क्षणार्धात गायब झाल्याचे तुम्हाला दिसेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
कपड्यांवर पडलेले चहाचे डाग निघतच नाही ना? या ट्रिकने चकाचक होतील कपडे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल