TRENDING:

फक्त कलिंगडचं नाही तर त्याच्या साली सुद्धा फायदेशीर, ब्लड प्रेशरची समस्या होईल दूर

Last Updated:
सध्या तीव्र उन्हाळा जाणवत आहे. देशातील काही भाग उष्णतेची लाट अनुभवायला मिळत आहे. उष्मा वाढला की आपण आपल्या आहारात देखील बदल करतो. उन्हाळ्यात काकडी, शहाळं अर्थात नारळ पाणी, कलिंगड, खरबुज, वेगवेगळ्या फळांचं ज्युस, लिंबू आदींचा आहारात समावेश करतो. उष्म्यामुळे शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी हे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत.
advertisement
1/5
फक्त कलिंगडचं नाही तर त्याच्या साली सुद्धा आरोग्यासाठी फायदेशीर
सध्या बाजारात लाल चुटूक कलिंगड पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्यात कलिंगड खाणं आरोग्यासाठी हितावह असतं. आपण कलिंगड घरी आणलं की ते कापून त्यातील लाल रंगाचा गर खातो आणि बिया, सालं टाकून देतो. पण कलिंगडाची साल देखील आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. यामुळे आरोग्याच्या काही समस्या दूर होऊ शकतात. कलिंगडाच्या सालीचे फायदे सविस्तर जाणून घेऊया.
advertisement
2/5
उन्हाळ्यात कलिंगड खाण्याची मजा काही औरच असते. शरीराला थंडावा मिळावा यासाठी लोक आवर्जून कलिंगड खातात. या फळात पाण्याचं प्रमाण मुबलक असतं. हे फळ कापल्यावर त्यातील गर खाऊन साल फेकून दिलं जातं. पण उन्हाळ्यात कलिंगडाची साल खाणं आरोग्यासाठी हितावह असतं.
advertisement
3/5
उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी लोक काही विशिष्ट पदार्थांचा आहार समावेश करतात. कलिंगडासह त्याची साल आरोग्यदायी मानले जाते. देशातील प्रसिद्ध न्युट्रिशन तज्ज्ञ निखील वत्स यांनी सांगितले की, `कलिंगडाच्या सालीचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचा उजळून निघते.` कलिंगडाची साल स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर ती शिजवून त्याचे सेवन करू शकता. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. या सालामुळे मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन मिळतात.
advertisement
4/5
शरीरात संसर्ग होऊ नये यासाठी कलिंगडाची साल फायदेशीर ठरते. काही व्यक्तींना मसालेदार, तिखट पदार्थ खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो. कलिंगडाच्या सालीचं सेवन केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. तसेच यामुळे बद्धकोष्ठता दूर होते. चुकीची लाइफ स्टाइल आणि आहारामुळे अनेक व्यक्तींना लठ्ठपणासारख्या समस्यांचा सामना करावा लागतो. कलिंगडाच्या सालीचे सेवन केल्यास ही समस्या दूर होऊ शकते. कारण या सालात फायबर मुबलक असते. त्यामुळे पचनशक्ती सुधारते आणि पोट लगेच भरल्यासारखं वाटतं.
advertisement
5/5
ब्लड प्रेशरची समस्या कमी करण्यासाठी कलिंगडाची साल उपयुक्त मानली जाते. कलिंगडाची साल उकडून खावी. या सालीमध्ये पोटॅशियम मुबलक असते. जर तुम्हाला तणाव जाणवत असेल तर तो तो दूर करण्यासाठी कलिंगडाची साल फायदेशीर आहे. हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी कलिंगडाच्या सालीचा वापर तुम्ही करू शकता.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
फक्त कलिंगडचं नाही तर त्याच्या साली सुद्धा फायदेशीर, ब्लड प्रेशरची समस्या होईल दूर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल