TRENDING:

'तारक मेहता' पाहिल्याशिवाय तुम्हालाही जेवण जात नाही? Adiction मगे काय आहे सायकॉलॉजी ट्रॅप

Last Updated:
why people cant eat without watching Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : अनेकदा आपण विचार करतो की असं का होतं किंवा लोक असं का करत असतील? पण या गोष्टीला जास्त सिरियस गोष्ट न मानून आपण त्याकडे कानाडोळा करतो. पण यासंबंधीत रिसर्चमध्ये अशी एक गोष्ट समोर आली आहे की ते ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल.
advertisement
1/9
'तारक मेहता' पाहिल्याशिवाय जेवण जात नाही? Adiction मगे काय आहे सायकॉलॉजी ट्रॅप
आपल्यापैकी अनेकांची सवय असते की ते खाली वेळेत बसले असतील किंवा जेवत असतील तर त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) पाहायला आवडतो. तुम्ही तुमच्या आजुबाजूला असे लोक पाहिले असतील किंवा अगदी तुम्हाला देखील अशी सवय असेल की न कळतच जेवताना "तारक मेहता' पाहिल्या शिवाय जेवण जात नाही. अनेकदा आपण विचार करतो की असं का होतं किंवा लोक असं का करत असतील? पण या गोष्टीला जास्त सिरियस गोष्ट न मानून आपण त्याकडे कानाडोळा करतो. पण यासंबंधीत रिसर्चमध्ये अशी एक गोष्ट समोर आली आहे की ते ऐकून तुम्हाला ही धक्का बसेल. ( why people cant eat without watching Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)
advertisement
2/9
दिवसभराचा ताण कमी करण्यासाठी आणि जेवण अधिक रुचकर बनवण्यासाठी टीव्हीवर एखादी आवडती मालिका लावणे. ऑफिसमधून किंवा कामावरून थकून आल्यावर, शांतपणे जेवण करताना काहीतरी हलकं-फुलकं आणि हसवणारं बघणं कोणाला आवडणार नाही? यासाठी अनेक कुटुंबांमध्ये एक 'नियम' असतो, टीव्हीवर फक्त 'तारक मेहता का उल्टा चष्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) ही मालिकाच लावली जाते. ( why people cant eat without watching Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)
advertisement
3/9
यामागे एक सोपं आणि खूप महत्त्वाची सायकोलॉजी लपलेली आहे, वारंवार बघण्यासाठी मालिकांना मानसशास्त्रात 'कम्फर्ट व्ह्यूईंग' (Comfort Viewing) किंवा 'पॅरासोशल रिलेशनशिप' (Parasocial Relationship) असे म्हणतात. चला त्यामागील काही कारणं समजून घेऊ.
advertisement
4/9
1. सुरक्षितता आणि आराम (Safety and Comfort)जेव्हा तुम्ही तीच मालिका पुन्हा पाहता, तेव्हा तुम्हाला कथा (Story) माहीत असते. त्यामुळे मेंदूला नवीन माहितीवर प्रक्रिया (Processing) करावी लागत नाही. यामुळे मनाला खूप सुरक्षित आणि आरामदायी वाटते. जेवताना किंवा तणावात असताना, मेंदूला विश्रांती हवी असते आणि TMKOC सारख्या मालिका नेमकी तीच विश्रांती देतात.
advertisement
5/9
2. नॉस्टॅल्जिया आणि बंध (Nostalgia and Connection)या मालिकांमध्ये गोकुळधाम सोसायटीसारखे एक आदर्श समाज दाखवले जाते. लोकांना वाटते की हे 'आपले' लोक आहेत. वारंवार पाहिल्याने या पात्रांशी एक भावनिक बंध निर्माण होतो. जुने एपिसोड्स पाहिल्याने 'नॉस्टॅल्जिया' वाढतो आणि एक सकारात्मक भावना मिळते.
advertisement
6/9
3. सुसंगतीची गरज (Need for Consistency):या मालिकांचा 'पॅटर्न' कधी बदलत नाही. प्रत्येक एपिसोडमध्ये समस्या येते, ती सोडवली जाते आणि शेवटी सर्व काही ठीक होते. ही सुसंगती ॉ लोकांना आवडते आणि जीवनातील अनिश्चिततेमध्ये एक मानसिक आधार देते.
advertisement
7/9
'TMKOC' प्रमाणेच वारंवार पाहिल्या जाणाऱ्या इतर मालिकाफक्त 'तारक मेहता'च नाही, तर जगभरात अशा अनेक सिटकॉम (Sitcoms) मालिका आहेत, ज्या लोक वारंवार पाहतात. यासाठी 'कॉमेडी' आणि 'कुटुंब-आधारित कथानक' (Family-Centric Plot) ही मुख्य कारणे आहेत.
advertisement
8/9
भारतातील आणि जागतिक स्तरावर अशा लोकप्रिय मालिका:तारक मेहता का उल्टा चष्मा कौटुंबिक सिटकॉम, साधे विनोद, आदर्श कुटुंब आणि सकारात्मकतासाराभाई व्हर्सेस साराभाई सिटकॉम/डार्क कॉमेडी तीक्ष्ण विनोद, पात्रांचा विशिष्ट स्वभावफ्रेंड्स ग्लोबल सिटकॉम, घट्ट मैत्री, साधे आणि 'रिलेटेबल' आयुष्यद बिग बँग थिअरी सिटकॉम/ geek comedy बुद्धी आणि विनोदाचे मिश्रणरामायण आणि महाभारत पौराणिक मालिका धार्मिक श्रद्धा आणि सांस्कृतिक मुल्य
advertisement
9/9
या सर्व मालिका एक 'सुरक्षित जागा' (Safe Space) तयार करतात, जिथे तुम्हाला कथेबद्दल विचार न करता फक्त आराम करता येतो. त्यामुळे पुढच्या वेळी तुम्ही जेवताना टीव्हीवर TMKOC लावाल, तेव्हा लक्षात ठेवा की यामागे केवळ तुमची आवड नाही, तर तुमच्या मनाची विश्रांतीची नैसर्गिक गरज दडलेली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
'तारक मेहता' पाहिल्याशिवाय तुम्हालाही जेवण जात नाही? Adiction मगे काय आहे सायकॉलॉजी ट्रॅप
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल