TRENDING:

टॉप लोड की फ्रंट लोड? नवी वॉशिंग मशीन घेताना गोंधळात पडलाय? खरेदीपूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या

Last Updated:
जेव्हा आपण नवीन मशीन खरेदी करायला मार्केटमध्ये जातो, तेव्हा सेल्समन आपल्याला दोन पर्याय देतो, टॉप लोड (Top Load) आणि फ्रंट लोड (Front Load).
advertisement
1/8
टॉप लोड की फ्रंट लोड कोणची चांगली? नवी वॉशिंग मशीन खरेदीपूर्वी फरक जाणून घ्या
सकाळची घाई, ऑफिसला जाण्याची गडबड आणि त्यात साचलेला कपड्यांचा ढीग... अशा वेळी आपल्या मदतीला धावून येते ती म्हणजे 'वॉशिंग मशीन'. आजच्या धावपळीच्या युगात वॉशिंग मशीन हे चैनीचे साधन नसून ती घराघरातील गरज बनली आहे. पण जेव्हा आपण नवीन मशीन खरेदी करायला मार्केटमध्ये जातो, तेव्हा सेल्समन आपल्याला दोन पर्याय देतो, टॉप लोड (Top Load) आणि फ्रंट लोड (Front Load).
advertisement
2/8
अनेकदा आपल्याला वाटते की दोन्ही मशीन कपडेच धुतात, मग फरक काय? पण या दोघांच्या किंमतीत, धुण्याच्या पद्धतीत आणि विजेच्या वापरात जमीन-अस्मानाचा फरक असतो. तुमच्या कुटुंबासाठी कोणती मशीन योग्य ठरेल? चला तर मग, या दोन्ही तंत्रज्ञानातील 'बारीक' फरक समजून घेऊया.
advertisement
3/8
1. फ्रंट लोड वॉशिंग मशीन: तंत्रज्ञान आणि फायदे (Front Load)ज्यांना कपड्यांची स्वच्छता आणि प्रीमिअम फिचर्स हवे आहेत, त्यांच्यासाठी फ्रंट लोड हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये कपडे धुण्यासाठी 'टम्बल मोड'चा वापर होतो, जो हट्टी डाग काढण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. हे तंत्रज्ञान कमी पाण्यात आणि कमी वीज वापरात कपडे स्वच्छ धुते, ज्यामुळे तुमच्या खिशावरचा भार कमी होतो. टम्बल मोडमुळे कपड्यांमधील धाग्यांना इजा पोहोचत नाही आणि ते कोमल पद्धतीने धुतले जातात. या मशीन्स चालताना खूप कमी आवाज करतात, त्यामुळे घरात शांतता राहते. कपड्यांतील पाणी शोषून घेण्याची क्षमता जास्त असल्याने, कपडे सुकण्यासाठी कमी वेळ लागतो.
advertisement
4/8
फ्रंट लोड मशीन्स थोड्या महाग असतात आणि यांचा 'वॉशिंग सायकल' पूर्ण होण्यास जास्त वेळ लागतो. तसेच, आतून ओलावा राहिल्यास बुरशी लागण्याची शक्यता असते, त्यामुळे वेळोवेळी दरवाजा उघडा ठेवावा लागतो.
advertisement
5/8
2. टॉप लोड वॉशिंग मशीन: सोय आणि बजेट (Top Load)जर तुमचे बजेट मर्यादित असेल आणि तुम्हाला वापरासाठी सोपी मशीन हवी असेल, तर टॉप लोड तुमच्यासाठी आहे. या मशीन्सची किंमत फ्रंट लोडच्या तुलनेत कमी असते. यामध्ये वाकून कपडे टाकण्याची गरज नसते. शिवाय, मशीन सुरू असतानाही तुम्ही मध्येच एखादा विसरलेला कपडा टाकू शकता, जे फ्रंट लोडमध्ये शक्य नसते.
advertisement
6/8
वरून उघडी असल्याने यातील ओलावा लवकर निघून जातो, त्यामुळे बुरशी किंवा दुर्गंधी येण्याचा धोका कमी असतो. टॉप लोड मशीनमध्ये पाणी आणि वीज जास्त लागते. तसेच, काही वेळा हे तंत्रज्ञान कपड्यांच्या धाग्यांसाठी थोडे कठोर ठरू शकते.
advertisement
7/8
मग तुमच्यासाठी कोणती मशीन 'बेस्ट' आहे?खरेदी करण्यापूर्वी स्वतःला हे 3 प्रश्न विचारा:1. बजेट किती आहे? कमी बजेट असेल तर टॉप लोड घ्या, जास्त फिचर्स हवे असतील तर फ्रंट लोड निवडा.2. जागा किती आहे? फ्रंट लोड मशीन तुम्ही किचन कॅबिनेटमध्येही बसवू शकता, पण टॉप लोडसाठी वरच्या बाजूला मोकळी जागा लागते.3. पाण्याची उपलब्धता, जर तुमच्याकडे पाण्याची टंचाई असेल, तर फ्रंट लोड मशीन तुमच्यासाठी वरदान ठरेल.
advertisement
8/8
वॉशिंग मशीन घेताना घाई न करता दोन्हीमधील हा फरक लक्षात घ्या आणि मगच योग्य निर्णय घ्या. यामुळे तुमचे पैसे तर वाचतीलच, पण तुमचे कपडेही दीर्घकाळ टिकतील.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
टॉप लोड की फ्रंट लोड? नवी वॉशिंग मशीन घेताना गोंधळात पडलाय? खरेदीपूर्वी 'हे' फरक नक्की जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल