TRENDING:

जानेवारी महिन्यात एंटरटेनमेंटचा महाडोस; 'धुरंधर' ते 'तेरे इश्क में', OTT वर येणार 6 जबरदस्त फिल्म्स, कुठे पाहाल?

Last Updated:
January 2026 OTT Releases: जानेवारी महिना ओटीटी प्रेमींसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी असणार नाही. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आता सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन आणि रोमान्सचा धुमधडाका पाहायला मिळणार आहे.
advertisement
1/8
'धुरंधर' ते 'तेरे इश्क में', OTT वर येणार 6 जबरदस्त फिल्म्स, कुठे पाहाल?
ओटीटी </a>प्रेमींसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी असणार नाही. नेटफ्लिक्सपासून ते सोनी लिव्हपर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आता सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन आणि रोमान्सचा धुमधडाका पाहायला मिळणार आहे." width="1200" height="900" /> मुंबई: २०२६ चं स्वागत अवघ्या देशाने जल्लोषात केलंय आणि आता वेळ आली आहे ती घरबसल्या मनोरंजनाचा आनंद घेण्याची. जानेवारी महिना ओटीटी प्रेमींसाठी एखाद्या मेजवानीपेक्षा कमी असणार नाही. नेटफ्लिक्सपासून ते सोनी लिव्हपर्यंत प्रत्येक प्लॅटफॉर्मवर आता सस्पेन्स, थ्रिलर, ॲक्शन आणि रोमान्सचा धुमधडाका पाहायला मिळणार आहे.
advertisement
2/8
वर्षाची पहिली मोठी रिलीज म्हणजे 'हक'. २ जानेवारीला हा कोर्टरूम ड्रामा नेटफ्लिक्सवर दाखल झाला आहे. यामी गौतम आणि इमरान हाशमी पहिल्यांदाच एकत्र दिसत असून, ही कथा प्रसिद्ध 'शाहबानो' केसवर आधारित आहे. एका महिलेने आपल्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी दिलेली ही झुंज अंगावर काटा आणणारी आहे.
advertisement
3/8
जर तुम्हाला हलकं-फुलकं काही पाहायचं असेल, तर ९ जानेवारी ही तारीख कॅलेंडरवर मार्क करून ठेवा. अजय देवगण, रकुल प्रीत सिंह आणि आर. माधवन यांचा 'दे दे प्यार दे २' नेटफ्लिक्सवर येतोय. वयातील अंतर आणि त्यातून निर्माण होणारी विनोदी परिस्थिती तुम्हाला नक्कीच खळाळून हसवेल.
advertisement
4/8
सोनी लिव्हवरील 'फ्रीडम एट मिडनाइट' या सीरिजचा पहिला सीझन प्रचंड गाजला होता. आता ९ जानेवारीला याचा दुसरा सीझन येतोय. फाळणीनंतरचा भारत, नेहरू-पटेल यांचे निर्णय आणि सर्वसामान्यांचे हाल असं जळजळीत वास्तव यात मांडलं आहे. सिद्धार्थ गुप्ता पुन्हा एकदा नेहरूंच्या भूमिकेत भाव खाऊन जाणार आहे.
advertisement
5/8
इमरान हाशमीचे चाहते असाल तर १४ जानेवारीला नेटफ्लिक्सवर 'तस्करी: द स्मगलर्स' पाहायला विसरू नका. मुंबई एअरपोर्टवर चालणारं सोन्याचं आणि ड्रग्जचं काळेबेरे, पोलीस यंत्रणा आणि अंडरकव्हर ऑपरेशन्सचा थरार या सीरिजमध्ये पाहायला मिळेल.
advertisement
6/8
१९६२ च्या भारत-चीन युद्धातील अंगावर काटा आणणारा पराक्रम पाहायचा असेल, तर फरहान अख्तरचा '१२० बहादूर' नक्की पहा. मेजर शैतान सिंह यांच्या नेतृत्वाखाली १२० भारतीय जवानांनी हजारो चिनी सैनिकांना कसं थोपवलं, याची ही शौर्यगाथा १६ जानेवारीला प्राईम व्हिडिओवर रिलीज होणार आहे.
advertisement
7/8
'तेरे इश्क में': धनुष आणि कृती सेनन यांची ही जबरदस्त लव्हस्टोरी जानेवारीच्या अखेरीस नेटफ्लिक्सवर येण्याची शक्यता आहे.
advertisement
8/8
२०२५ मधला सर्वात मोठा ब्लॉकबस्टर चित्रपट 'धुरंधर'च्या ओटीटी रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. चर्चा अशी आहे की, ३० जानेवारीला हा सिनेमा नेटफ्लिक्सवर धडक देऊन दणक्यात महिन्याचा शेवट करेल.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मनोरंजन/
जानेवारी महिन्यात एंटरटेनमेंटचा महाडोस; 'धुरंधर' ते 'तेरे इश्क में', OTT वर येणार 6 जबरदस्त फिल्म्स, कुठे पाहाल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल