TRENDING:

Winter : थंडीत एकच स्वेटर किती दिवस वापरला पाहिजे? जास्त वेळ घालण्याचे काय आहेत नुकसान?

Last Updated:

काही लोक तर संपूर्ण सीझन एकच स्वेटर न धुता वापरतात. पण तुमची ही सवय आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? स्वेटर नक्की किती दिवसांनी धुतला पाहिजे आणि तो न धुण्याचे परिणाम काय होतात, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिवाळा सुरू झाला की कपाटातील गरम कपडे आणि स्वेटर बाहेर निघतात. बदलत्या फॅशननुसार आपण रंगीबेरंगी स्वेटर घेतो, पण हेच स्वेटर स्वच्छ करण्याच्या बाबतीत आपण थोडे आळशी असतो. 'स्वेटर तर आहे, कुठे घाण होतोय?' किंवा 'याला कुठे वास येतोय?' असं म्हणून आपण एकाच स्वेटरवर आठवडे वापरतो. काही लोक तर संपूर्ण सीझन एकच स्वेटर न धुता वापरतात. पण तुमची ही सवय आरोग्यासाठी किती घातक ठरू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? स्वेटर नक्की किती दिवसांनी धुतला पाहिजे आणि तो न धुण्याचे परिणाम काय होतात, हे तज्ज्ञांकडून जाणून घेऊया.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

स्वेटर रोज धुण्याची गरज आहे का?

दिल्ली मेडिकल असोसिएशनचे तज्ज्ञ आणि वरिष्ठ फिजिशियन यांच्या मते, स्वेटर रोज धुण्याची गरज नसते. कारण आपण स्वेटर थेट त्वचेवर न घालता आतून इनर किंवा टी-शर्ट घालतो. त्यामुळे शरीराचा घाम थेट स्वेटरला लागत नाही. जर तुम्ही दिवसातून काही तास आणि आत कपडे घालून स्वेटर वापरत असाल, तर 3 ते 5 दिवस एक स्वेटर आरामात वापरता येतो.

advertisement

आठवडाभरानंतर धुणे अनिवार्य

लोकरीचे कापड (Woolen Fabric) लवकर दुर्गंधी पकडत नाही, हे जरी खरे असले तरी याचा अर्थ असा नाही की तो महिनाभर धुवू नये. तज्ज्ञांच्या मते, किमान एका आठवड्याच्या वापरानंतर स्वेटर स्वच्छ धुणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक आहे. महिनोनमहिने एकच स्वेटर वापरल्याने त्यावर धुलीकण आणि जंतूंचा थर साचतो.

त्वचेच्या गंभीर समस्यांचा धोका

advertisement

जर तुम्ही बराच काळ न धुता स्वेटर वापरला, तर त्वचेवर पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा ॲलर्जी होणे अशा समस्या उद्भवू शकतात. स्वेटरच्या धाग्यांमध्ये साचलेला घाम, धूळ आणि त्वचेतून निघणारे नैसर्गिक तेल (Oil) यामुळे फंगल इन्फेक्शन होण्याचा मोठा धोका असतो, विशेषतः ज्यांची त्वचा संवेदनशील आहे त्यांनी अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

advertisement

श्वासोच्छवासाचे विकार वाढू शकतात

तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण गलिच्छ स्वेटरमुळे केवळ त्वचाच नाही तर फुफ्फुसांचे आरोग्यही बिघडू शकते. स्वेटरमध्ये साचलेली धूळ आणि एलर्जन्स श्वासाद्वारे शरीरात जातात. यामुळे सतत शिंका येणे, नाक वाहणे किंवा अस्थमा (दमा) असलेल्या रुग्णांचा त्रास वाढू शकतो.

स्वेटरचे आयुष्य होते कमी

स्वेटर वेळोवेळी न धुतल्याने त्यातील धागे कमकुवत होतात. घाम आणि घाणीमुळे लोकरीची लवचिकता संपते, ज्यामुळे स्वेटर लवकर सैल होतो किंवा त्याचा आकार बिघडतो. जर तुम्हाला तुमचा आवडता स्वेटर वर्षानुवर्षे नवा कोरा हवा असेल, तर योग्य अंतराने त्याची स्वच्छता करणे फायदेशीर ठरते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनचे दर वाढले, कापूस आणि तुरीला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

जर तुम्ही धूळ किंवा प्रदूषणाच्या ठिकाणी जात असाल, तर 2 ते 3 दिवसांत स्वेटर धुणे सर्वोत्तम आहे. अन्यथा, 4 ते 5 दिवसांनी तो धुवायलाच हवा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter : थंडीत एकच स्वेटर किती दिवस वापरला पाहिजे? जास्त वेळ घालण्याचे काय आहेत नुकसान?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल