Pune Tourism: दिवाळीत फिरायला जायचा प्लॅन करताय? तर पुण्यातील या ठिकाणांना नक्की द्या भेट
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Diwali Tourism: यंदा दिवाळीच्या सुट्ट्यांत तुम्ही फिरायचे नियोजन करत असाल, तर तुम्ही अगदी कमी खर्चात पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. आपण पुण्यातील अशाच भन्नाट ठिकाणांबाबत जाणून घेऊ.
advertisement
1/7

जर तुम्ही फिरायचे नियोजन करत असाल, तर तुम्ही अगदी कमी खर्चात पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. आज आपण पुण्यातील अशी भन्नाट ठिकाणे जाणून घेणार आहोत, जिथे तुम्ही कमी वेळेत आणि कमी खर्चात भेट देऊ शकता.
advertisement
2/7
पुणे शहरातील शनिवारवाडा ही एक अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक वास्तू आहे. पेशवेकालीन वैभवाची झलक दाखवणारा हा वाडा पहिले बाजीराव पेशवे यांनी सन 1736 मध्ये बांधला होता. सुरुवातीला लाकडाच्या बांधकामाचा असलेला हा राजवाडा पेशव्यांचे निवासस्थान आणि शासनाचे केंद्र म्हणून ओळखला जात होता. पुढे इंग्रजांच्या आक्रमणात हा वाडा मोठ्या प्रमाणात नष्ट झाला. आज या ठिकाणी फक्त दगडी भिंती आणि पाया शिल्लक असला, तरीही शनिवारवाडा पाहताना त्या वैभवशाली काळाची आठवण प्रत्येकाला होते.
advertisement
3/7
पुण्याच्या मध्यभागी असलेले लाल महल हे शहरातील एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचे ठिकाण आहे. या महलात छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण गेले आणि त्यांनी येथेच स्वराज्याचे धडे गिरवले. इतिहासात उल्लेखनीय घटना म्हणजे स्वराज्यावर आक्रमण करणाऱ्या शाहिस्तेखानाची बोट याच महलात शिवाजी महाराजांनी छाटली होती. या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला इतिहासाची अनुभूती नक्की येईल.
advertisement
4/7
पर्वती ही महाराष्ट्रातील पुणे शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरून टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे 640 मीटर आहे. सुमारे 103 पायऱ्या चढून येथे पोहोचता येते. या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात. या टेकडीच्या माथ्यावर देवदेवेश्वर मंदिर व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत.
advertisement
5/7
पुण्यातील पु.ल.देशपांडे या सुप्रसिद्ध गार्डनचे पूर्वीचे नाव ‘ओकायामा फ्रेंडशिप गार्डन’ असे होते. पुण्यातील सिंहगड रोडवर हे उद्यान वसलेले आहे. याची रचना जपानी उद्यानपद्धतीची आहे. जपानमधील ओकोयामा शहरातील 300 वर्षांपूर्वीच्या प्रसिद्ध कोराक्वेन उद्यानाच्या धर्तीवर विकसित केलेले भारतातील एक उद्यान आहे.
advertisement
6/7
महाराष्ट्रातील अत्यंत प्रसिद्ध आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. हा किल्ला ट्रेकिंगसाठी सोपा मानला जातो; मात्र किल्ल्यावर पोहोचण्यासाठी सुमारे 1500 पायऱ्या चढाव्या लागतात. राजगड ट्रेक हे पुण्याजवळील एक दिवसात पूर्ण करता येणारे सर्वोत्तम ट्रेकिंग स्थळ आहे.
advertisement
7/7
भारतातील पॅराग्लायडिंग राजधानी म्हणून ओळखले जाणारे कामशेत हे पुण्यात आहे. हे पुण्यापासून 45 किमी, लोणावळा आणि खंडाळ्यापासून 16 किमी आणि मुंबईपासून 110 किमी अंतरावर आहे. पश्चिम घाटाने वेढलेले आणि सह्याद्री पर्वतरांगांच्या सौंदर्याने सजलेले कामशेत हे समृद्ध वनस्पती आणि निसर्गाने नटलेले आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/Travel/
Pune Tourism: दिवाळीत फिरायला जायचा प्लॅन करताय? तर पुण्यातील या ठिकाणांना नक्की द्या भेट