Vadhdivasachya Shubhecha : प्रिय व्यक्तीला द्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..! खास बनेल त्यांचा दिवस
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Udand Ayushyachya Anant Shubhechha : वाढदिवसाच्या साधारण शुभेच्छा तर सर्वजण आपल्या जवळच्या व्यक्तींना देतात. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी काही आशीर्वादरूपी खास शुभेच्छा घेऊन आलो आहोत.
advertisement
1/12

आपणास शिवनेरीची श्रीमंती, रायगडाची भव्यता पुरंदरची दिव्यता, सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो, हीच शिवचरणी प्रार्थना, आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi), आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..!
advertisement
2/12
नेहमी निरोगी रहा तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
3/12
संकल्प असावेत नवे तुझे, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे, ह्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा, आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
4/12
शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी, कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी, तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे, तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे, आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
5/12
तुमच्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुमच्या हृदयात सतत तेवत राहो, हीच मनस्वी शुभकामना, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
6/12
व्हावीस तू शतायुषी, व्हावीस तू दीर्घायुषी, ही एकच माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी, आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
7/12
उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो, बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो, आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास उदंड आयुष्य देवो..!
advertisement
8/12
आज तुझा वाढदिवस, वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक तुझं यश तुझं ज्ञान आणि तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो आणि सुखसमृद्धीची बहार, तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो, आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
9/12
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस, सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा, केवळ सोन्यासारख्या लोकांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
10/12
नवा गंध नवा आनंद, निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा आणि नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा, आई तुळजाभवानी आपणास आशीर्वाद देवो, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
advertisement
11/12
कोणाच्या हुकमावर नाय जगत, स्वतःचा रूबाबवर जगतोय, अशा दिलदार व्यक्तिमत्वाला, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा, आई तुळजाभवानी आपणास अनेक आशीर्वाद देवो..!
advertisement
12/12
लखलखते तारे, सळसळते वारे, फुलणारी फुले इंद्रधनुष्याचे झुले तुझ्यासाठीच उभे आज सारे तारे, उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..!
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Vadhdivasachya Shubhecha : प्रिय व्यक्तीला द्या उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा..! खास बनेल त्यांचा दिवस