PHOTOS : गाव असं भारी की कुणीच जात नाही शहराला, असं काय आहे या खेड्यात?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
सध्या गावाकडून शहराकडे जायचा विचार वाढत आहे. असे असताना एक गाव असे आहे, ज्याठिकाणी हे गाव कुणालाच सोडायचे नाही. प्रत्येक जण शहरापेक्षाही याठिकाणी चांगलं आयुष्य जगत आहे. गावाचे सरपंच हे अनिल कुमार गुप्ता यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सन्मानित केले आहे. (सिमरनजीत सिंह, प्रतिनिधी)
advertisement
1/7

उत्तरप्रदेशातील भटपुरा रसूलपुर असे या गावाचे नाव आहे. अनिल कुमार गुप्ता येथील सरपंच आहे. त्यांच्या गावाची लोकसंख्या 4994 इतकी आहे. यामध्ये 3769 इतके गावातील मतदान आहे. संपूर्ण गावातील 54 रस्त्यांवर रंगीत इंटरलॉकिंग करण्यात आली आहे. सर्व रस्त्यांच्या बाजूला काँक्रीटचे नाले बांधण्यात आले आहेत.
advertisement
2/7
इतकेच नव्हे तर गावाच्या सर्व रस्त्यांना महापुरुष आणि वयोवदृद्धांचे नाव देण्यात आले आहे. गावाची सुंदरता वाढवण्यासाठी गावात तीन सेल्फी पॉइंट आणि दोन भव्य मंदिरेही बांधली आहेत. गावातील लोकांना एकाच जागी बसून आपले गप्पा कराव्या यासाठी उद्यान तयार करण्यात आले आहे. गावात आठ मिनी गोशेड बांधण्यात आले आहेत. याठिकाणी गायींना संरक्षण मिळत आहे.
advertisement
3/7
गावात स्वच्छता राहावी यासाठी गावातील प्रत्येक घरात शौचालय आहे, तसेच गावात 5 सार्वजनिक स्वच्छालय तयार करण्यात आले आहे. गावात स्वच्छता करण्यासाठी पाच स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. जे दररोज गावात साफसफाई करतात. गावात ग्रामपंचायतीजवळ 1000 पेक्षा जास्त झाडे लावण्यात आली आहेत. यामध्ये 300 झाडांना ट्रीगार्डकडून संरक्षणही देण्यात आले आहे.
advertisement
4/7
गावात स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्यासाठी 57 इंडिया मार्का हँडपंप बसवण्यात आले आहेत. इतकेच नाही तर पाणी साठवण्यासाठी सोकपीटही करण्यात आले आहेत. गावात एकूण 26 तलाव आहेत.
advertisement
5/7
गावाची सुरक्षा लक्षात घेता 16 जागेवर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामुळे गावात ठिकठिकाणी निगराणी ठेवली जाते. गावातील नागरिक खूप शांतता प्रिय आहेत. तसेच सर्व लोक एकत्र राहतात.
advertisement
6/7
गावातील विकासकामांसाठी गावाचे सरपंच अनिल कुमार गुप्ता यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2015 मध्ये पंचायत सशक्तीकरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तसेच 2022 मध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री पंचायत प्रोत्साहन पुरस्कार दिला.
advertisement
7/7
तसेच 2023 मध्ये प्रदेशातील सर्वश्रेष्ठ सरपंच पुरस्काराने अनिल कुमार गुप्ता यांना सन्मानित करण्यात आले. इतकेच नव्हे तर गावात शहराच्या धर्तीवर गावात होत असलेला विकास पाहता राज्य सरकारने केरळ आणि चंदीगड, पंजाब येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ग्रामप्रमुख अनिलकुमार गुप्ता यांना पाठवले होते.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
PHOTOS : गाव असं भारी की कुणीच जात नाही शहराला, असं काय आहे या खेड्यात?