TRENDING:

Long Haul Flights : लांब पल्ल्याच्या फ्लाईटने प्रवास करायचाय? 'या' सोप्या टिप्सने प्रवास होईल त्रासमुक्त..

Last Updated:
How to prepare for long-haul flights : लांबचा प्रवास करून नवीन ठिकाणे आणि संस्कृती जाणून घेणे, हे प्रत्येक भटकंतीची आवड असलेल्या व्यक्तीचे स्वप्न असते. पण अशा लामबच्या पल्ल्याच्या फ्लाईटने प्रवास करणे कधीकधी थोडे कठीण असू शकते. प्रवास त्रासमुक्त करण्यासाठी अनेक गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल अशी एक सोपी चेकलिस्ट येथे दिली आहे.
advertisement
1/7
लांब पल्ल्याच्या फ्लाईटने प्रवास करायचाय? 'या' टिप्सने प्रवास होईल त्रासमुक्त
तुम्ही योग्य संशोधन केले आहे याची खात्री करा. तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात, त्या ठिकाणाबद्दल सर्व काही जाणून घेण्याचा प्रयत्न करा. ब्लॉग्स आणि वेबसाईटस् तुम्हाला भेट देण्याच्या ठिकाणांबद्दल आणि इतर प्रवाशांच्या टिप्सबद्दल भरपूर माहिती देऊ शकतात.
advertisement
2/7
तुमचा पासपोर्ट तपासा. काही देशांमध्ये प्रवास करताना तुमच्या पासपोर्टची वैधता किमान 6 महिने असणे आवश्यक आहे.
advertisement
3/7
तुमचे एटीएम/क्रेडिट कार्ड परदेशात काम करते की नाही याची खात्री करा.
advertisement
4/7
तुमचे सर्व तिकिटे, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स आणि महत्त्वाचे दस्तऐवज स्कॅन करा आणि त्यांची प्रत गूगल क्लाउड, आयक्लाउड आणि ड्रॉपबॉक्स सारख्या क्लाउड-आधारित स्टोरेजमध्ये ठेवा. जर तुमची कागदपत्रं हरवली तर तुम्ही त्यांना सहज ॲक्सेस करू शकता.
advertisement
5/7
तुमची लसीकरणे अद्ययावत आहेत का याची खात्री करा. प्रवासाला जाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि प्रवासादरम्यान तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व औषधे आणि औषधोपचारांची व्यवस्था करा.
advertisement
6/7
विमान कंपन्यांकडून सामान हरवणे किंवा विमानांना उशीर होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे तुमच्या सोबतच्या बॅगमध्ये कपड्यांचा एक अतिरिक्त सेट पॅक करा.
advertisement
7/7
जर तुम्ही दुसऱ्या टाइम झोनमध्ये प्रवास करत असाल, तर जेट-लॅगबद्दल थोडी माहिती घ्या आणि त्यातून लवकर बरे होण्यासाठी काय उपाय असतात, याबद्दल जाणून घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Long Haul Flights : लांब पल्ल्याच्या फ्लाईटने प्रवास करायचाय? 'या' सोप्या टिप्सने प्रवास होईल त्रासमुक्त..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल