TRENDING:

Health Risk Of The Day : भात खाणं सोडलं तर काय होईल?

Last Updated:
भात खाल्ल्याने झोप येते, वजन वाढतं, असं म्हणतात. त्यामुळे या समस्या उद्भवल्या की अनेक लोक भात कमी खाण्याचा किंवा न खाण्याचा सल्ला देतात. भात खाणं सोडलं तर शरीरावर काय परिणाम याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
advertisement
1/7
Health Risk Of The Day : भात खाणं सोडलं तर काय होईल?
भात हा भारतीय आहारातील मुख्य पदार्थ आहेत. भात कमी खाल्ल्याने किंवा खाणं बंद केल्याने शरीरावर बरेच परिणाम होऊ शकतात.  भात कमी खाल्ल्याने किंवा भात न खाल्ल्याने शरीरावर त्याचा काय परिणाम होतो याबाबत काही रिसर्चही करण्यात आले आहेत.
advertisement
2/7
अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनच्या मते, एका अभ्यासानुसार भात कमी केल्याने शर्कराही नियंत्रणात राहण्यात मदत होते. मधुमेहींसाठी हे चांगलं आहे.
advertisement
3/7
भातात फायबर असतं, जे पचनप्रणालीसाठी फायदेशीर असतं. पण भात न खाल्ल्याने पचनसंबंधी समस्या उद्भवू शकतात.
advertisement
4/7
भातात कॅलरी असते त्यामुळे ते खाणं कमी केलं किंवा बंद केलं तर वजन कमी होऊ शकतं, असं जर्नल ऑफ अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटेटिक्समध्ये म्हटलं आहे. पण यासोबत स्वस्थ आहार आणि व्यायामही असायला हवा.
advertisement
5/7
भातात कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला ऊर्जा देतात. भात खाल्ला नाही तर थकवा किंवा कमजोरी जाणवू शकते.
advertisement
6/7
भातात व्हिटॅमिन, मिनरल्स असे पोषक घटक असतात भात खाणं बंद केलं आणि हे पोषक घटक असणारे इतर पदार्थ खाल्ले नाहीत तर शरीरात या पोषक घटकांची कमतरता होईल, असं जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये म्हटलं आहे.
advertisement
7/7
भात कमी खाणं किंवा न खाणं याचा परिणाम व्यक्तीनुसार वेगवेगळा असू शकतो. आहाराची गुणवत्ता आणि इतर जीवनशैली यावरही हे अवलंबून आहे. जर तुम्ही भात पूर्णपणे सोडण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/लाइफस्टाईल/
Health Risk Of The Day : भात खाणं सोडलं तर काय होईल?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल